Sunday, October 15, 2023

प्रवासी ग्राम सदस्याचे ग्राम पंचायतीला पत्र

 मी या ग्राम पंचायतीचा गावातील एक प्रवासी सदस्य , 

जर निवडणूक होत आहे तर सर्व भूमिपूजन झालेल्या संकल्पांचे लोकार्पण करण्याची जबाबदारी येणाऱ्या नवीन स्थानिक स्वराज्य संस्थेची असेलच यामध्ये दुमत नाही, आणि हे काम ठरलेल्या वेळेत होईल याची खात्री सर्व ग्रामस्थ करून घेतीलच.

जर मागील 5 वर्षात काही विकासकार्ये झाले असे मान्य केले तर आता ग्रामस्थांच्या अपेक्षा सहिजिकच वाढल्या आहेत .

गावाला जर अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा नंतर काही लागते ते म्हणजे प्रसारमाध्यमे आणि दळणवळणाच्या सोयी.

ज्या गोष्टी साहजिकच ह्या गावाला जगाशी जोडण्यासाठी महत्त्वाच्या आहेत .

जर मी म्हणालो की या गावातील सूना आणि लेकी या गावाला प्रवास करने टाळतात कारण 24 तास चालणाऱ्या शहरात राहणाऱ्या आम्हा लोकांना सार्वजनिक वाहतूक उपलब्ध नाही तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही .

त्यासाठी गावाला एक बसस्टँड असणे आणि त्यासाठी गावातून  लागेल तो पाठपुरावा करून ते आपल्या पदरात पाडून घेणे हे नवीन प्रथम नागरिकाचे कर्तव्य असावे.

तसेच गावाला जोडणारे सर्व रस्ते रहदारीयोग्य असावेत.

संत तुकडोजी चा भाषेत सांगायचं झालं तर 

गाव हा विश्वाचा नकाशा! गावावरून देशाची परीक्षा! गावचि भंगता अवदशा! येईल देशा!!

विश्वाच्या नकाशा असलेल्या गावाचा नकाशा प्रत्येक गावच्या ग्रामदेवता असलेल्या मंदिरात असावा . जो पुढे जाऊन तुम्हाला नवीन शोध घेण्यासाठी सहकार्य करेल .

ह्या गावाला ह्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी कोणी घेत असेल आणि त्यासाठी ती मनापासून प्रयत्न करणार असेल तर सर्व गावकरी मतांच्या स्वरूपात त्याला प्रथम सहकार्य करतील.

आता सदस्यांचे महत्व काय हे जर समजून सांगायचं झालं तर आपापल्या वॉर्डातून काय मागण्या आहेत त्या पोचवून त्यासाठी योग्य तो पाठपुरावा करने हे त्यांचे कर्तव्य आहे.

आज एवढेच, 

आमचा सहवास सणावाराला , करतो प्रवास पुन्हा राहत्या प्रदेशाला.

आपलाच एक प्रवासी ग्राम सदस्य . 



No comments:

Post a Comment