Monday, November 7, 2022

आधुनिक वनवास - प्रकार

पूर्वकल्पना: -आधुनिक वनवास (स्थलांतर, वसाहत इत्यादी)

ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि

तन्नो रुद्रः प्रचोदयात्॥

हा वनवासाच्या टप्प्यातील अंतिम प्रकार जो शिवाला वर्णन करतो जेव्हा तो सतीच्या विरहात होता सर्व जगापासून स्वतःला दूर करण्याचा प्रयत्न करत होता  ,ह्या प्रकारात असलेला मनुष्य त्रिकालदर्शी (omniscient) असतो  आणि संसारात तो रमणारा बिलकुल नसतो . आणि इतिहासात जेवढे काही महान व्यक्ती झाले ते त्यांच्या शिखरस्तरावर तेव्हाच होते जेव्हा ते एकटे होते ,त्यांच्या  सामर्थ्याला सीमा घालणारे कोणी नसते . जगाच्या रचनेत घडावे असे बदल ह्या वनवासी मनुष्याच्या हातून घडतात . 


न निर्मिता केन न दृष्टपूर्वा न श्रूयते हेममयी कुरङ्गी ।
तथापि तृष्णा रघुनन्दनस्य विनाशकाले विपरीतबुद्धिः ॥

हा वनवासाचा मध्यम प्रकार आहे जेथे सामर्थ्याची परीक्षा घेणारी  आणि सामर्थ्याला आवर घालणारी एकाच व्यक्ती असते  हा प्रकार रामाला वर्णन करतो जेथे कधीही ना ऐकेलेल्या एका गोष्टीसाठी मनुष्य धडपडत राहतो  जसे रामाने सुवर्णमृगासाठी केले. माणसाच्या मर्यादा अधोरेखित करून मर्यादा धर्मात परिवर्तित (learned  helplessness ) करण्यासाठी हे काम करतात . मनुष्याला त्याच्या धर्माची जाणीव करून देत राहतात . 


क्लैब्यं मा स्म गमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते ।
क्षुद्रं हृदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप ॥2.3॥

हा वनवासातील  बहुतेक  जणांच्या जीवनांत असलेला  प्रकार आहे  हा अर्जुनाला वर्णन करतो  जेथे सामर्थ्याची परीक्षा  घेणारे क्षणोक्षणी भेटत राहतात पण  जो  जड गोष्टींसाठी   अविरत परिश्रम करत राहतो  . भले काही ठिकाणी त्याला  त्याची हृदयाची दुर्बलता आणि  थकवा ग्रासत राहतो . (materialism ) जडवाद हा शिकवायची गोष्ट नसते फक्त ती अनुभवायची  , भोगायची गोष्ट आहे हे सिद्ध करत राहतात .