Monday, May 11, 2020

पृथ्वी शेषाच्या मस्तकावर आहे

लहानपणी एक गोष्ट ऐकली होती
कि वेगवेगळ्या दिशांनी पृथ्वी कोठे आहे याबाबत माहितीसाठी वेगवेगळ्या गोष्टी आहेत कोणी म्हणत होते की कासवाच्या पाठीवर, हत्तीच्या पाठीवर,
आणि आपल्याकडे कहाणी आहे की ती शेषनागाच्या मस्तकावर.
या गोष्टी भलेही काल्पनिक आहेत कारण सर्वजण विज्ञानानुसार जाणतात की सौरमाला आणि गुरुत्वाकर्षण यात पृथ्वी एक मैलाचा दगड आहे जेथे आपण राहतो.
पण या कल्पनेत एक मोलाचा सार आहे तो म्हणजे हत्ती, कासव,  शेषनाग हे जर पृथ्वीचा भार ऊचलतात तर ते पेलण्याची ताकद फक्त त्यांच्यात आहे कोणी ईतर ते पशू नाही ते पेलु शकते नाही त्यांच्या स्वभावात ते गुणधर्म आढळतात.
परिस्थिती कसलीही असो ते जे पृथ्वीचा भार वाहतात ते समाधान मानत असतात.

व्यवस्थेत जे भार वाहणारे  आहेत त्यांची संख्या तुलनेने त्यांच्यापेक्षा अधिक  आहे जे व्यवस्थापक किंवा व्यवस्थेत त्यांच्या वरच्या श्रेणीत आहेत.

संस्कृती आणि जन्म तसेच सहवास आणि अधिकार याद्वारे जे ज्या श्रेणीमध्ये पोहोचले आहेत ते परिस्थितीनुसार श्रेणी बदलतील पण भारवाहू हे नेहमीच दुर्लक्षित राहिलेले आहेत जरी ते संघटीत असतील किंवा असंघटित.

कारण व्यवस्था हे सांगते की निर्णय हे जे भार उचलतात ते घेत नाहीत कारण तो अधिकार त्यांना व्यवस्था देत नाही
ते तर व्यवस्थापकांनी केलेल्या निर्णयांना बांधील राहून सोपवलेली  कर्तव्ये पार पाडतात.
त्यांचे निर्णय बदलण्याची   क्षमता असलेल्या व्यवस्थापकाला अजून एक गोष्ट माहीत आहे ती म्हणजे त्यांच्या मनात असलेल्या प्रलोभने तसेच नाईलाज
यांची असलेली जाणीव. ही त्याला स्वतःला स्वतःचे निर्णय थोपवण्यात मदत करत असते.

अजुन एक गोष्ट म्हणजे भारवाहू हे एकत्र असतांना ते व्यवस्थेला पुरक अशाच गोष्टींचे समर्थन करतात.
(उदा.  उसतोड कामगार असो की आतंकी सैनिक ते आपापल्या व्यवस्थेविरूद्ध नाही जातात नाही ते कोणाकडून ऐकून घेऊ शकतात).

जन्म  से बैरागी जब संसार का हिस्सा होने चला तब यही कहने का अवसर मिला!!!

जब कभी धर्म और व्यवस्था के नाम पर अवडंबर होगा.
तब व्यवस्था बदली जाये ये अनिवार्य होगा!!!

कोई श्रेणी ही ना रहे ऐसा समय ही परिणाम होगा!!!
विधीविधान तुमसे जन्मे है तुम विधीविधान से नही ये आकलन हर हर महादेव की गुंज से होगा !!!