Saturday, February 11, 2017

आधुनिक वनवास (स्थलांतर, वसाहत इत्यादी)

हा लेख त्यांना उत्तर असेल जे विचारतात कि सर्व देव भारतातच का झाले बाकी देशात नाही आजच्या परिस्थितीत सांगायचे तर आजही अफगाणिस्थान आणि इंडोनेशिया बेटे या ठिकाणी तसेच थाइलंड सारख्या देशात रामाचा इतिहास जपला जातो. तसेच इथे अजून वर्णन करू इच्छितो कि महाभारतपेक्षा जटील राजकारण हे रामायणात आहे कारण आज जसे सुशिक्षित बेरोजगार किंवा महत्त्वकान्क्षी तरुण परगावी जाण्यास प्रवृत्त होतात तसेच जुन्या काळी क्षत्रिय एक तर जन्मभूमीवर राज्य करत किंवा वनवासाला जाण्यास भाग पाडले जात. आता ज्यांना इतिहासाला पुरान बनवून माणसाला देव बनवायचे आहे त्यांच्या दृष्टीने हे भयानक असेल पण राजा रामाने वनवासात असतांना त्याचा त्याचा मुलभूत गुणधर्म नाही सोडला क्षत्रियांचा धर्म असतो नगरांची उभारणी करणे यात रामाला नेहमीच यश आले तरी युद्ध हेसुद्धा क्षत्रियांच्या धर्मात असतेच तिकडे दहा भावनांनी पूर्ण असलेला ब्राम्हण राजा दशानन रावनाच्या राज्यात जनता सुखी नव्हती असे नाही पण इथेच धर्म संपून राजकारण सुरु होते आणि जे देव दानव सुरासुर चातुर्वण्य प्रमाण मानतात त्यांना धक्का बसतो कारण मी याअगोदरही लिहिले आहे . रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीचे नाते हे मोठे होते आहे आणि राहील आणि सुग्रीव बिभीषण यांच्या महत्त्वकान्क्षा पूर्ण करण्यासाठी रामाने मित्र या नात्याने जे करता येईल ते केले यात समदु:खी असणे हे मुलभूत कारण होते एक म्हणजे सुग्रीव आणि रामाचे दुख(पत्नीचा विरह ) आणि दुसरे बिभीषण आणि सुग्रीवाच दुख (भावाची गादी आणि जन्मभर चाकरी तरी हाती काही नाही). 
आजही त्याच मार्गाने जात आहात तरी लक्षात ठेवा राज्य कोणतेही असले तरी राजधान्या तुमच्या  असल्या पाहिजेत आणि राजधानीचे सार्वभौमत्व तसेच तेथील विविधता टिकून ठेवणे हे आपले काम आहे. कारण विविधता असेल तरच आदान प्रदान होईल आणि ते करणारे व्यापारी (वैश्य ) जगतील आणि तुमची सुरुवात कशीही असो तुम्ही नगरे वसवण्यात सिंहाचा वाटा उचलला पाहिजे. सर्व विषमता जाणून त्यात खितपत पडण्यापेक्षा सर्व विषमता जाणून तुमची सध्याची परिस्थिती काय आहे आणि आपण सर्व एकमेकांवर अवलंबून अहोत हे जाणून प्रत्येक उपलब्ध गोष्टीचा उपयोग करायला शिका .
कारण युद्धजन्य परिस्थितीत संसाधने हे विकेंद्रित होतात जे कि एकाच वर्गाची मक्तेदारी म्हणून बघितले जातात आणि प्रत्येक संसाधनाचा योग्य वेळी योग्य ठिकाणी आणि योग्य रीतीने वापर केला तरच नगर भरभराटीस येतात.

आता नेमके काय करायचे ? 
याचे उत्तर देतांना आपल्याकडे दोन मार्ग आहेत 
एकतर आज जिथे आहात तिथे नागरी वसाहत स्वयंपूर्ण करा म्हणजे बाहेरून येणाऱ्या सगळ्या गोष्टी तुमच्या प्रदेशात असतील तर त्याचे उत्पादन सर्वांना पुरेल एवढे होईपर्यंतची व्यवस्था निर्माण करा 
नाही तर मग असे एक ठिकाण निवडा जिथे सर्व आहे आणि तिथे जाऊन वसाहती निर्माण करा. 

असे सांगितले जाते कि पृथ्वीवर एवढे आहे ज्याने सगळ्यांची "गरज "भागेल ,पण एवढेही नाही कि एखाद्याची "हौस" भागेल . 
म्हणून जमिनीवरील संसाधनांचे चक्र हे वार्षिक किंवा पंचवार्षिक दशवार्षिक आहे  जे कि आपल्या जीवनास पूरक तसेच पुढच्या पिढ्यांना माहिती देण्यास साजेसे आहे  जमिनीखालील संसाधनाचे चक्र आपल्या जीवनचक्राच्या कितीतरी पटीने मंद आहे आणि जमिनीखाली असलेल्या संसाध्नासाठी लागणारे पदार्थ कसे जाऊन मिळतात हे आपल्याला माहित नाही याउलट जमिनीवरील सर्व संसाधनाची सर्व प्रक्रिया आपण करत असल्याने ती सोयीस्कर रित्या आपण पुनर्निर्मित करू शकतो .
या गोष्टी सर्वांना  लहान पणापासून कळल्या पाहिजेत अशी व्यवस्था निर्माण करा. 
आणि हो तुमची शरीररचना हि तुम्हाला लाभलेल्या जल,वायू , अधिवास यांवर अवलंबून आहे म्हणून कोणी जर तुमच्या रचनेवरून तुमची तुलना करत असेल तर तुमच्या रचनेचे सर्व  बारकावे समजून सांगता येईल एवढे ज्ञान तरी तुमच्यात असावेच (यात अन्न वस्त्र आणि निवारा याचे ज्ञानाचा समावेश होतो). म्हणून कोणत्याही न्यूनगंडापायी अपप्रचाराला बळी पडून संपत्ती नष्ट करू नका.

आणि शेवटचे स्पष्ट बोलतो माफ करा "पण माझ्या मते कोणत्याही धर्माच्या पंथाच्या जातीच्या संप्रदायाच्या 'पुजार्यांना'  जर ते ज्याच्या बळावर उपदेश करतात त्या ग्रंथांचे  ज्ञान नसेल आणि त्या ग्रंथाचे ज्ञान असूनही ते देण्याची आसक्ती नसेल आणि शेवटी ग्रंथातील ज्ञानाला वैचारिक पातळीवर आजच्या काळानुसार काय बदल करायचा ते जमत नसेल तर ते माझ्या दृष्टीने देवाचे व्यापारी आहेत आणि काही नाही "
तसेच आजच्या काळात अनेक कारणांसाठी धर्मबदल करतांना प्रथम जिथे आहात ते ग्रंथ सविस्तर वाचा जिथे जाणार आहात ते सविस्तर वाचा आणि जो ग्रंथ आजच्या घडीला तुम्हाला न्याय देत असेल तो निवडा कारण एकदा तुमच्यात झालेले बदल तुमच्या पुढच्या पिढीने बघितले तर त्यांनाही जाणीव राहते कि जसे बदल आपल्यागोदर काही ठराविक कारणांसाठी झाले ते पुढे बदलावे किंवा न बदलावे .



शिवम प्रल्हाद तौर
राहणार: शेलगाव  तालुका: माजलगाव  जिल्हा: बीड
राज्य :महाराष्ट्र  देश: भारत
वसुन्धरैव कुटुम्बकम