Tuesday, June 27, 2017

दोन वेळेसाठी लढनार्यांचा धर्म तो कोणता

 अन्न, वस्त्र , निवारा या मानवाच्या मुलभूत गरजा आहेत आणि धर्म, अर्थ, काम हे माणसाने माणसासाठी एका विशिष्ट हेतू साठी निर्माण केलेल्या व्यवस्था आहेत त्यात मुलभूत हेतू आहे तो म्हणजे माणूस हा अनुकरणशील प्राणी आहे , तसेच तो समाजशील सुद्धा आहे , म्हणजे तो एक तर पंचज्ञानेन्द्रियाने जे साठवतो ते तो परत वापरू शकतो आणि त्याला कळपात राहायची सवय आहे म्हणून तो इतर जंगली पशु तसेच निर्विकार पाळीव पशु या पेक्षा वेगळा आहे याची नेहमी जाणीव राहावी यासाठी प्रत्येक वेळी काल ,वेळ, स्थळ, इत्यादी  यांचा  विचार करून संहिता बनविल्या गेल्या त्यात व्यवस्था कशी चालवली जावी कोण कशा प्रकारे कोणत्या प्रसंगी पुढाकार आणि माघार घ्यावी (कारणासहित)  आणि त्या व्यवस्थेत धर्म , अर्थ , काम यांची सांगड घातली गेली. 

सुखस्य मूलं धर्मः , धर्मस्य मूलं अर्थः |
अर्थस्य मूलं राज्यं , राज्यस्य मूलं इन्द्रिय जयः ||
इन्द्रियाजयस्य मूलं विनयः, विनयस्य मूलं वृद्धोपसेवः |||
वृद्धोपसेवाय विग्न्यानं , विग्न्यानेनं आत्मानं सम्पद्येत
समपदितात्म जितात्मम भवति, जितात्मा सर्वार्थे संयुज्यते ||||

सुख का मूल धर्म है. धर्म का मूल अर्थ है. अर्थ का मूल राज्य है. राज्य का मूल इंद्रिय विजय है.
आणि इंद्रिय विजय म्हणजे काम विजय (काम या शब्दाचा अर्थ पंच्ज्ञानेद्रियांची हौस कारण जी भागवली जात नाही ती हौस असते ) त्याच मूळ विनय ,वृद्धांची सेवा,विज्ञान ज्याने आत्मा जितात्मा होऊन पावन होतो 
आता सुख नावाच्या गोष्टी साठी काय काय लागते हे वर दिले आहे 
पण सुख म्हणजे नेमके काय असते हे कळण्यासाठी अन्न , वस्त्र , निवारा या मुलभूत गरजा पूर्ण होणे आवश्यक आहे. जर त्यासाठीच एखाद्याची सर्व उर्जा खर्च होत असेल तर तो वरील कोणत्याही गोष्टीचा विचार करत नसावा.
नव्हे त्याला किंचितही फरक पडत नसावा आणि व्यवस्थाही त्याचा विचार करीत नाही असा त्याचा वैक्तिक समाज असेल. कारण व्यवस्था फक्त दोन स्थान देते भाग अथवा शिकार जे माणसे व्यवस्थेचा भाग असतात ते जून आहे ते चालू राहावे या साठी आग्रही असतात आणि जे लोक शिकार असतात ते या लोकांकडून सहानुभूती प्राप्त करत असतात कारण मूळ हे तटस्थ असले तरी नवीन काही तरी अनुकरणीय असले कि मनुष्य प्राणी मागे पुढे जास्त बघत नाही .

पण एक गोष्ट  मात्र  खरी आहे व्यवस्था आली कि मक्तेदारी नावाचा प्रकार दिसून येतोच . आजच्या काळात न्याय,संरक्षण,शासन,अर्थ,माध्यम,ह्या नवीन व्यवस्था आहेत आणि त्यातही जाणीवपूर्वक मक्तेदारीला आमंत्रण दिले जाते, आणि या कोणत्याही व्यवस्थेत नसणारे ते आहेत आमचे तटस्थ, दोन वेळेसाठी लढणारे , फक्त विचारंनी भाजी भाकरी मिळत नाही त्यासाठी कष्टच करावे लागतात हे ठासुन सांगणारे !
त्यांना हे व्यवस्थेतील मक्तेदार कधी आपुलकी दाखवतात अन व्यवस्थेत घेतात तर कधी तुच्छ वागणूक देऊन शिकार बनवतात अन मग चक्र पुन्हा चालू राहते जो व्यवस्थेत गेला तो व्यवस्थेचे गोडवे गोता अन  जो शिकार झाला तो व्यवस्थेला शह देण्याची वात पेटवून व्यवस्थेपर्यंत ती आग पोचण्याची वाट  बघतो.
यात कितीही विचार केला तरी आपण या तटस्थ लोकांचा सुखामागचा मूळ हेतू धर्म नाही सांगू शकत 
जे काही औपचारिक धर्म या नावाने चालणारे गडे आहे त्या संहिता माणसाने बनवल्या यात कुठेही दुमत नसावे त्यामागे दोन मूळ कारणे १) जुना अनुभव 2) वर्तमान परिस्थिती या दोन गोष्टी संहिता लिहितांना हाताळल्या जातात अन नेहमी  शिकार झालेले लोकच त्यावर विश्लेषण करून बदलाची मागणी करतात हे प्रत्येक संहितेचे विशेष म्हणावे लागेल कारण प्रत्येक संहितेने भविष्यासाठी काही नसेल केले पण हे व्यवस्थेचे शिकार त्या मूळ हेतूचे कार्य साध्य करतात म्हणजे माणसाच्या मूळ स्वभावातच ते रुजलेले आहे असे म्हणावे लागेल 
बाकी शेवटच्या ओळी तथाकथित बुद्धीजीवी अन अनुयायी लोकांसाठी 



" कभी मनुने  लिखी थी संहिता कभी भीमराव ने लिखा था संविधान पार आज भी सरकारी व्यवस्था मी चार हि स्तर (क्लास) है और बिगरसरकारी (अतिशूद्र ) तो गिनती मे भी नाही आते   तो बताओ कोनसी व्यवस्था बदली कोनसा समाज बदला न व्य्वस्था बदली न बदला समाज बदला तो बस व्यवस्था मी तुमारा स्थान !!!"


शिवम प्रल्हाद तौर
राहणार: शेलगाव  तालुका: माजलगाव  जिल्हा: बीड
राज्य :महाराष्ट्र  देश: भारत
वसुन्धरैव कुटुम्बकम   

Sunday, June 18, 2017

व्यवस्था : एक श्रेणी बद्ध रचना

व्यवस्था ही एक श्रेणीबद्ध रचना आहे आणि त्यातील श्रेणी आणि श्रेणीचे स्थान खालील पद्धतीने ठरवले जाते

१) प्रमाण : वेळ ,पैसा, श्रम, ज्ञान याच्या प्रमानावरून श्रेणीतील स्थान ठरते

2) समावेशाचा काल: जो जितक्या अगोदर श्रेणीमध्ये समाविष्ट झाला तो तितक्या लवकर श्रेणीचे स्थान पक्के करत जातो.त्यात वर दिलेले मुद्दे ठरावास कारणीभूत ठरतात

३) वंश , वडिलोपार्जित कर्म : वाडवडिलांनी ज्या श्रेणीत काम केले त्या श्रेणीत वंशज काम करत राहील असा एक प्राथमिक समज आहे तरी एखादा वंशज पाहिजे तेव्हा आप्तांचा रोष पत्करून तसेच सहानुभूती आणि दरारा यांच्या जोरावर श्रेणी व स्थान बदलू शकतो

४)महत्त्वकान्क्षा : जर सर्व व्यवस्था एके ठिकाणी काही परिस्थितीमुळे एका माणसाकडे आकर्षित होत असेल तर त्या माणसाची मह्त्वकान्क्षा ठरवते कि तो अन त्याची श्रेणी कोठवर जाऊ शकते

५) पर्यायी श्रेणी : पर्यायी श्रेणी तयार झाल्यास बहुतेक लोक त्या श्रेणीमध्ये समाविष्ट होण्याचा प्रयत्न करतील आणि जुन्या श्रेणी नष्ट करण्याचा प्रयत्न करतील पण उरलेले लोक जुन्या श्रेन्यांना चिटकून राहतील.

६)व्यवस्था डळमळीत होणे किंवा अतिप्रासंगिक होणे   : हा रचनेचा शेवटचा पण निर्णायक भाग जेव्हा व्यवस्थेतील सर्व लोक एकमेकांवर अवलंबून आहेत याची जाणीव सर्वांना झालेली असेल तसेच प्रसंगानुसार कोणीही कधीही श्रेणी आणि स्थान बदलत राहील आणि काही तथाकथित विचारवंत व्यवस्था बनवानार्याला कशी अक्कल नव्हती हे सिद्ध करायला जीव खर्ची घालतील आणि सर्व श्रेन्यांतून त्यांना संमिश्र प्रतिक्रिया मिळतील



पण एक गोष्ट मात्र कोनिहि विसरता कामा नये

" व्यवस्था न बदली हे, न बदलेगी ,बदलेगा तो बस  व्यवस्था मे तुम्हारा स्थान "!!!


Sunday, April 30, 2017

सहानुभूती किंवा दहशत :रहस्यांचा समुद्र शिवा Sympathy or Terror :Shiva the Ocean of Secrets

पुराणांत शिवाचे दोन रूप दाखवले जातात एकाला नाव भोला सांब किंवा शंभो आणि दुसर्याला नाव आहे रुद्र किंवा भैरव

जेव्हा मनुने संहिता बनवली, तेव्हा शिवा भोला सांब होता त्याने सुरुवातीला तिच्याशी जुळवून घ्यायचे ठरवले कारण तो एक कृषक होता ,निर्माण कर्ता होता म्हणून त्याला सहानुभूतीची गरज होती म्हणून त्याने हि व्यवस्था स्वीकारली. म्हणजे, शिवा(सांब शंभो )-निर्माण-सहानुभूती -जुळवून घेणे. हा प्रकृतीचा नियम आहे म्हणजे उत्पादक कृषक जो आहे त्याला सहानुभूतीची सगळ्यात जास्त गरज आहे . कारण तो निर्माण कार्य करत असतो आणि त्याचे परिणाम सर्वांच्या जीवनावर होतो तोही चांगला .
आता शिवाच्या दुसर्या रुपाकडे लक्ष देऊ शिवाने जुळवून घेण्याचा खूप प्रयत्न केला ,पण व्यवस्था जेव्हा सहानुभूती देते तेव्हा त्याला अनेक समस्या निर्माण करते,हे त्याच्या लक्षात आले मग त्याचेच रुपांतर झाले ते समोरे जाण्याला म्हणजे व्यवस्थेत ज्या काही समस्या त्याला दिसू लागल्या ,त्याला त्याने सामोरे जायचे ठरवले आणि स्वतःची दहशत निर्माण केली तिचे कारण ज्या समस्या त्याला समोर येतील त्याचा नाश करन्यासाठी म्हणजे शिवा (रुद्र भैरव )-नाश -दहशत -सामोरे जाने
पर्यायाने आपण म्हणू शकता कि शिवा जेव्हा सांब रुपात होता त्याला सहानुभूती मिळाली ,पण त्याची हार त्यातच आली आणि शिव जेव्हा रुद्र रुपात आला तेव्हा त्याच्या दहशतीने त्याला जीत मिळवून दिली
यातून हे लक्षात येते कि
 शिवा(सांब शंभो )-निर्माण-सहानुभूती-जुळवून घेणे-हार(व्यवस्थेचा भाग)
शिवा (रुद्र भैरव )-नाश -दहशत -सामोरे जाने-जीत(व्यवस्थेचा शिकार )
ज्या माणसाला काही नवीन निर्माण करण्याची इच्छा आहे त्याने सर्वांची सहनिभूती प्राप्त करणे योग्य आहे आणि तो माणूस व्यवस्थेचा भाग असला  पाहजे
जो माणूस व्यवस्थेचा शिकार झाला आहे तो स्वतःची दहशत निर्माण करून व्यवस्था नष्ट करण्या साठी कार्यरत असतो



There are two forms of Shiva in the Purana, one is named Bhola Samb or Shambho and the other is Rudra or Bhairav.

When Manu made a code, Shiva Bhola was a Sambha, he initially decided to adapt to that because he was a farmer, so he needed sympathy, so he adopted this arrangement, that is Shiva (Samb Shamba) - Creation-Sympathy-Follw. That is, the productive farmer who is most needed for sympathy. Because it is working on the construction and its effects are on everyone's life, even better
 Now Shiva tried to adapt to another form of Shiva, but when the system gave sympathy, he realized that it would create many problems. Once he got converted, he decided to face any problems that he had seen in the system and his own panic The problem that caused him will cause him to come to the front To destroy him, Shiva (Rudra Bhairav) -Destruction-Terror-Face
Alternatively, you can say that Shiva was sympathetic when he was Sambhu, but his defeat came in and Shiva gave him victory when he came in Rudra
From this it realizes that
 Shiva (Samb Shamba) - Creation - Sympathy-Follow-Defeat (Part of the system)
Shiva (Rudra Bhairav) -Destruction -Terror-Face-Victory (system hunting)
The person who wants to create something new is the right person to be able to take care of everyone and it is a part of the system.
The person who is hunted by the system is working to create panic by destroying the system


THIS IS BINARY PHILOSOPHY
EITHER FACE OR FOLLOW
EITHER GET SYMPATHY OR TAKE THE HELP OF TERROR
EITHER CREATE SOMETHING OR DESTROY WHICH ISN'T NEEDED
THEN YOU WILL GET VICTORY OR DEFEAT
BE A SHAMBHO OR RUDRA


शिवम प्रल्हाद तौर 
राहणार: शेलगाव  तालुका: माजलगाव  जिल्हा: बीड 
राज्य :महाराष्ट्र  देश: भारत
वसुन्धरैव कुटुम्बकम   


Saturday, February 11, 2017

आधुनिक वनवास (स्थलांतर, वसाहत इत्यादी)

हा लेख त्यांना उत्तर असेल जे विचारतात कि सर्व देव भारतातच का झाले बाकी देशात नाही आजच्या परिस्थितीत सांगायचे तर आजही अफगाणिस्थान आणि इंडोनेशिया बेटे या ठिकाणी तसेच थाइलंड सारख्या देशात रामाचा इतिहास जपला जातो. तसेच इथे अजून वर्णन करू इच्छितो कि महाभारतपेक्षा जटील राजकारण हे रामायणात आहे कारण आज जसे सुशिक्षित बेरोजगार किंवा महत्त्वकान्क्षी तरुण परगावी जाण्यास प्रवृत्त होतात तसेच जुन्या काळी क्षत्रिय एक तर जन्मभूमीवर राज्य करत किंवा वनवासाला जाण्यास भाग पाडले जात. आता ज्यांना इतिहासाला पुरान बनवून माणसाला देव बनवायचे आहे त्यांच्या दृष्टीने हे भयानक असेल पण राजा रामाने वनवासात असतांना त्याचा त्याचा मुलभूत गुणधर्म नाही सोडला क्षत्रियांचा धर्म असतो नगरांची उभारणी करणे यात रामाला नेहमीच यश आले तरी युद्ध हेसुद्धा क्षत्रियांच्या धर्मात असतेच तिकडे दहा भावनांनी पूर्ण असलेला ब्राम्हण राजा दशानन रावनाच्या राज्यात जनता सुखी नव्हती असे नाही पण इथेच धर्म संपून राजकारण सुरु होते आणि जे देव दानव सुरासुर चातुर्वण्य प्रमाण मानतात त्यांना धक्का बसतो कारण मी याअगोदरही लिहिले आहे . रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीचे नाते हे मोठे होते आहे आणि राहील आणि सुग्रीव बिभीषण यांच्या महत्त्वकान्क्षा पूर्ण करण्यासाठी रामाने मित्र या नात्याने जे करता येईल ते केले यात समदु:खी असणे हे मुलभूत कारण होते एक म्हणजे सुग्रीव आणि रामाचे दुख(पत्नीचा विरह ) आणि दुसरे बिभीषण आणि सुग्रीवाच दुख (भावाची गादी आणि जन्मभर चाकरी तरी हाती काही नाही). 
आजही त्याच मार्गाने जात आहात तरी लक्षात ठेवा राज्य कोणतेही असले तरी राजधान्या तुमच्या  असल्या पाहिजेत आणि राजधानीचे सार्वभौमत्व तसेच तेथील विविधता टिकून ठेवणे हे आपले काम आहे. कारण विविधता असेल तरच आदान प्रदान होईल आणि ते करणारे व्यापारी (वैश्य ) जगतील आणि तुमची सुरुवात कशीही असो तुम्ही नगरे वसवण्यात सिंहाचा वाटा उचलला पाहिजे. सर्व विषमता जाणून त्यात खितपत पडण्यापेक्षा सर्व विषमता जाणून तुमची सध्याची परिस्थिती काय आहे आणि आपण सर्व एकमेकांवर अवलंबून अहोत हे जाणून प्रत्येक उपलब्ध गोष्टीचा उपयोग करायला शिका .
कारण युद्धजन्य परिस्थितीत संसाधने हे विकेंद्रित होतात जे कि एकाच वर्गाची मक्तेदारी म्हणून बघितले जातात आणि प्रत्येक संसाधनाचा योग्य वेळी योग्य ठिकाणी आणि योग्य रीतीने वापर केला तरच नगर भरभराटीस येतात.

आता नेमके काय करायचे ? 
याचे उत्तर देतांना आपल्याकडे दोन मार्ग आहेत 
एकतर आज जिथे आहात तिथे नागरी वसाहत स्वयंपूर्ण करा म्हणजे बाहेरून येणाऱ्या सगळ्या गोष्टी तुमच्या प्रदेशात असतील तर त्याचे उत्पादन सर्वांना पुरेल एवढे होईपर्यंतची व्यवस्था निर्माण करा 
नाही तर मग असे एक ठिकाण निवडा जिथे सर्व आहे आणि तिथे जाऊन वसाहती निर्माण करा. 

असे सांगितले जाते कि पृथ्वीवर एवढे आहे ज्याने सगळ्यांची "गरज "भागेल ,पण एवढेही नाही कि एखाद्याची "हौस" भागेल . 
म्हणून जमिनीवरील संसाधनांचे चक्र हे वार्षिक किंवा पंचवार्षिक दशवार्षिक आहे  जे कि आपल्या जीवनास पूरक तसेच पुढच्या पिढ्यांना माहिती देण्यास साजेसे आहे  जमिनीखालील संसाधनाचे चक्र आपल्या जीवनचक्राच्या कितीतरी पटीने मंद आहे आणि जमिनीखाली असलेल्या संसाध्नासाठी लागणारे पदार्थ कसे जाऊन मिळतात हे आपल्याला माहित नाही याउलट जमिनीवरील सर्व संसाधनाची सर्व प्रक्रिया आपण करत असल्याने ती सोयीस्कर रित्या आपण पुनर्निर्मित करू शकतो .
या गोष्टी सर्वांना  लहान पणापासून कळल्या पाहिजेत अशी व्यवस्था निर्माण करा. 
आणि हो तुमची शरीररचना हि तुम्हाला लाभलेल्या जल,वायू , अधिवास यांवर अवलंबून आहे म्हणून कोणी जर तुमच्या रचनेवरून तुमची तुलना करत असेल तर तुमच्या रचनेचे सर्व  बारकावे समजून सांगता येईल एवढे ज्ञान तरी तुमच्यात असावेच (यात अन्न वस्त्र आणि निवारा याचे ज्ञानाचा समावेश होतो). म्हणून कोणत्याही न्यूनगंडापायी अपप्रचाराला बळी पडून संपत्ती नष्ट करू नका.

आणि शेवटचे स्पष्ट बोलतो माफ करा "पण माझ्या मते कोणत्याही धर्माच्या पंथाच्या जातीच्या संप्रदायाच्या 'पुजार्यांना'  जर ते ज्याच्या बळावर उपदेश करतात त्या ग्रंथांचे  ज्ञान नसेल आणि त्या ग्रंथाचे ज्ञान असूनही ते देण्याची आसक्ती नसेल आणि शेवटी ग्रंथातील ज्ञानाला वैचारिक पातळीवर आजच्या काळानुसार काय बदल करायचा ते जमत नसेल तर ते माझ्या दृष्टीने देवाचे व्यापारी आहेत आणि काही नाही "
तसेच आजच्या काळात अनेक कारणांसाठी धर्मबदल करतांना प्रथम जिथे आहात ते ग्रंथ सविस्तर वाचा जिथे जाणार आहात ते सविस्तर वाचा आणि जो ग्रंथ आजच्या घडीला तुम्हाला न्याय देत असेल तो निवडा कारण एकदा तुमच्यात झालेले बदल तुमच्या पुढच्या पिढीने बघितले तर त्यांनाही जाणीव राहते कि जसे बदल आपल्यागोदर काही ठराविक कारणांसाठी झाले ते पुढे बदलावे किंवा न बदलावे .



शिवम प्रल्हाद तौर
राहणार: शेलगाव  तालुका: माजलगाव  जिल्हा: बीड
राज्य :महाराष्ट्र  देश: भारत
वसुन्धरैव कुटुम्बकम   

Saturday, January 28, 2017

चित्रपट विविधता आणि गुणधर्म

आजच्या जगात चित्रपट हे मध्यम आणि मनोरंजन् व्यवसायाचे एक प्रभावी शस्त्र आहे. तरीही जगात प्रत्येक ठिकाणच्या चित्रपटांविषयी तुलनात्मक माहिती आपण प्रामुख्याने सांगू शकतो उदा. चीनच्या कोणत्याही चित्रपटात कुंग फु असतेच . कितीही प्रयत्न केला तरी बॉलीवूड च्या चित्रपटातून आपण प्रेम नावाचा प्रकार आपल्याला काही अंशी का होईना दाखवलेलाच दिसतो. तर प्राथमिक मुद्दा असा कि हॉलीवूड चे चित्रपट ह्यांचा मुल गुणधर्म आहे निर्माण (प्रत्येक चित्रपटात निर्माण किंवा मानवनिर्मित गोष्टींना ज्या आज अस्तित्वात आहेत ) ते प्रत्येक गोष्टीत दाखवून देतात कि मानव काय निर्माण करू शकतो त्याने काय काय निर्माण केले त्याची बुद्धी कशी चालते इत्यादी . तर भारतीय चित्रपटात भावना महत्वाची तत्व महत्वाचे (इतिहासातही  डोकावून बघणारे सर्व चित्रपट हे नाही दाखवत कि काय काय निर्माण झाले  ) जरी कितीही चित्रपटात  निर्माण दाखवले तरी माणसाची ओळख , मुत्सद्देगिरी ,तत्व ,ह्या गोष्टी त्या निर्माणावर मात करून जातेच. आणि सहसा माणसामाणसांतील वाद , वैमनस्य , त्याची कारणे हे अत्यंत चांगल्या रीतिने येथे दाखवले जाते.   
   म्हणूनच कि काय येथील मनामनात त्याचा परिणाम झाल्याशिवाय राहत नाही या व्यक्तीपुजक देशात, जास्त अधिकार असलेल्या माणसाला (गटप्रमुख)येथे गटाचे मालक समजले जाते, मुळात तोही गटाचा (team) एक हिस्सा असतो हे कुणी मानतच नाही . तर हॉलीवूड मध्ये जरी गटप्रमुख दाखवला गेला तरी त्याच्या तोडीचे अनेक माणसे आपल्याला विवध ठिकाणी काम करतांना दिसतात .
संस्कृतीचे दर्शन आपल्याला याच चित्रपटांद्वारे घडते उदा.फ़क़्त परिणाम हा होतो कि निर्माण गाभा असलेल्या हॉलीवूड मध्ये रीतसर एखाद्या निर्माणाच श्रेय दुसरे कसे घेतात तसेच जे निर्माण करूनही जर त्याचे श्रेय न भेटल्याने वाईट मार्ग स्वीकारतात आणि वाईट ठरवले जातात हे ठसवले गेले असल्याने प्रत्येक जण श्रेय घेण्यासाठी धडपड करत असतो. 
आणि बॉलीवूड मध्ये अथवा सर्व भारतीय चित्रपट असे दाखवून देतात कि काही महत्वाकांक्षी लोकांमुळे जरी एखाद्या माणसाची प्रतिमा मलीन केली गेली तरी येथील माणसे प्रत्येकाच्या भूमिकेला न्याय देण्याच्या मार्गाने विचार करतात आणि त्यांना कळत कि यात मुळ श्रेय कोणाच असेल म्हणूनच कि काय आज श्रेय कोणीही घेतले तरी काही फरक पडत नाहि तसेच  आज जगाला तोडणारे कितीही मुद्दे असले तरी ते आपण खोडून काढून किंवा ते न करताही जगू शकतो.
तरीही याचा उलट वापर होतो हे हि धरून चालावेच लागते आणि असा वापर बुद्धीजीवी लोकच करतात आणि ते लोकं हे हि विसरून जातात कि आपल्याला भेटलेल्या प्रसिद्धीचा कोणाची निंदा करण्यासाठी वापर करणे आपल्या प्रसिद्धी साठी धोकादायक तर आहेच तसेच तुमची निंदा करणारेही तयार होतात याकडे दुर्लक्ष करून कसे चालेल 
आपले मत मांडण्याचे माध्यम म्हणून जरी बुद्धीजीवी याकडे बघत असले तरी इतिहास बदलण्याचे साधन म्हणून याकडे बघू नये(भले ते श्रेय हस्तांतरण असेल किंवा बदनामी असेल ) हि माझी अपेक्षा !!!

जय हिंद !!! जय महाराष्ट्र !!!
शिवम प्रल्हाद तौर 
राहणार: शेलगाव  तालुका: माजलगाव  जिल्हा: बीड  राज्य :महाराष्ट्र  देश: भारत
वसुन्धरैव कुटुम्बकम