Sunday, December 6, 2020

नवीन शेती कायदाआणि शेती .

खाउजा  आणि शेती यामध्ये काही संबंध आहे का ह्याचा विचार करताना
 गावाकडे दिवाळीला जाण्याचा प्रसंग आला . 

गावामध्ये जेव्हा सण समारंभ असतात तेव्हा लोक पर्यटन क्षेत्र म्हणतात , तेथील वातावरणाचा आनंद मिळतो . 

कारण अनेक ठिकाणचे आमच्यासारखे लोक तिथे एकत्र येतात प्रत्येकाचे रहाणीमान बोली वेगळी असते आणि गाव आणि तेथील लोक त्यांना सामावून घेतात. 

तसेच गावात गप्पा आणि बैठका तशा रोजच्याच पण अशा काळात विशेष करून बाहेरून आलेले लोकही त्याचा भाग होतात. 
अशाच बैठकीत जेव्हा हा  नवीन  शेती कायदा सगळीकडे प्रकाशझोतात होता ,तेव्हा हा विषय निघाला आणि आम्ही त्यात साहजिकच  सहभागी झालो. काही तपशिलांसह बैठकीत उपलब्ध सर्व गोष्ट खाली मांडत आहे . 

काही लोक सहजच गाव आणि शहर यातील पैशाचा फरक पाहून शहराकडे आकर्षित होतात ,
पण शहरात खर्च तेवढाच आहे म्हणून शहरातील पगार नावाची गोष्ट आणि गावातील उत्पन्न किंवा जे कोणी कारखान्यात काम करत आहेत त्यांचा पगार यात तफावत नक्कीच आहे . आणि त्याचे कारण म्हणजे कारखाने स्वतःची वीज खरेदी करतात असे नाही (तिथे power  plant  असतो) म्हणजे तेथील कामगारही पूर्णपणे वीजखर्चमुक्त असतो जो शहरात पगाराच्या १०% तरी असतो. 

त्यात भर म्हणजे शहरातील फॅक्टरी २४*७*३६५ चालूच असते पूर्ण बंद ती कधीच केली जात नाही (सर्व बंद असताना डागडुजी आणि विस्तार कार्य चालूच असते पण पूर्णपणे बंद नाही होत ). तसेच शहरेही २४ तास चालूच असतात. 

याउलट गावात जरी २४ तास गावातील लोक काम चालू ठेवतात पण बाहेरील जगाशी काही सोयीसुविधांअभावी संबंध तुटतो (दळणवळण ) . 
आणि कारखाने बोलाल तर प्रथम वरवर कच्चा माल हे कारण धरून ते ६-७ महिने चालतात असे कळलं पण त्यातही दळणवळण हे दुय्यम का होईना कारण होतेच . 
उरलेले ४-५ महिने हे पावसाळा आणि शेतात काम करणारे मजूर यांचे असतात . 

मूळ मुद्दा असा होता कि,
 जर अडाणी (तो व्यापारी जो modern  कणग्या बनवून सगळ्यात मोठा शेतकरी बनू पाहतो )
 गावात काही बदल करायला आला तर तो काय विचार करत असेल . 
१) गावात सगळ्या सुविधा आल्या तर गावही शहराप्रमाणं २४ तास चालवता येतील;
२) जसे कि कारखाने सध्या कोणत्याही कारणाने ४-५ महिने बंद असतात ते २ महिन्यांवर येतील कारण डागडुजी आणि विस्तार हे काम कमीत कमी २ महिन्यात पूर्ण होऊ शकते (source : Engineer - power  plant  ). 
३) हा फक्त या वाढलेल्या वेळेचा नफा जो आहे जो शेतकऱ्यांना मिळू शकत होता तो अडाणीला मिळेल . 
४) लॉजिस्टिक - कृषी उत्पन्न बाजार समिती ( जी आज सरकारी, सहकारी आहे ) जी सर्व व्यवस्था सांभाळते तिला खाजगी पर्याय अडाणी आणू शकतो जो साहजिकच त्याच्या फायद्याचा निर्णय असेल . 
बाकी जग आणि गाव  एकत्र होते आणि राहतील पण गावांचं गावपण शाबूत राहावं एवढच . 




चाँद तारो के आँगन में

 चाँद तारो के आँगन में  लढ चुके हम अपनी लढाई ।

लोगो ने अपने हिसाब से हमारी कहानी  बनायी ।।


ये जंग सीतारो ने लिखी ऐसा कहकर लढे हम जिंदगीभर | 

जमानेने भी बदलते बदलते कथा काव्य लिखे हमपर || 


जब तक सूरज चाँद रहेगा हमारी कहानी बनती रहेगी | 

हर भूमिका को न्याय और हर दिशा में स्वीकार ये कहेगी || 


हम ज़माने का और एक चेहरा देखे हैं | 

प्रेम को फिर भी रोखे हैं || 

बहुत कहानिया सुनायी प्यार की पर सुनने सुनाने वाले ना बता पाए ये बात | 

कौनसी कहानी ऐसी पायी जहा प्यार जीता मिला सवेरा ना मिली काली रात || 


यही जमाना है जिसका अंग मिनट और जंग है | 

प्यार और मजे के लिए कहा कोई जगह है || 

मानो या ना मानो  चाँद तारो के आँगन में  बहुत कुछ चलता रहेगा | 

हर एक का नसीब और  बाहुबल जंग के बीज बोएगा || 


सादिया बीती, सितारों ने चलाई -


हर एक ज़माने में लढाई 

वही लढाई हमने लढी 

तुम भी लड़ो आगे बढ़ो | 

फिर लढेंगे भाई भाई 

फिर ज़माने मे जंग खड़ी 

जल्दी दौड़ो झंडे गाडो || 


ताँकि तुम कह सको अपनों से बच के रहना सपनो से |

क्योकि तुमने लड़ी होगी तुम्हारी लड़ाई फिर लोग बनाएंगे तुम्हारी कहानी || 



Friday, November 13, 2020

गरज आणि हौस

 काल माणूस जे करून बसतो आणि मागे वळून बघतो पण  फक्त त्या  क्षणाचा आनंद  दिसतो ती हौस असते आणि आज जी माणसासमोर उभी राहून त्याला विचार करायला लावते ती गरज असते . सामान्य माणसांसाठी हा समजेल असा फरक आहे.

आपण किती जरी बोललो की चैन हा श्रीमंतांचा विषय असतो तरी आपली cycle वेगवेगळ्या असतात गणित एकच असते.


जसे की नवामध्यमवर्गिय लोक जगतात त्यात पगारी नंतर पहिला आठवडा हा गोल्डन विक असतो म्हणजे पैसा दिसण्यापासून तर पार्टी पर्यंत सर्व गोष्टी ह्या आठवड्यात होतात.

दुसरा आठवडा म्हणे सिल्व्हर विक यात पैसा सन्मार्गाला लागतो तो म्हणजे loan saving emi ह्या गोष्टी आम्ही या आठवड्यात आणून ठेवलेल्या असतात .

तिसरा आठवडा हा कॉपर विक जवळपास पैसा संपत आलेला असतो आणि माणसाला कळतच नाही की आपल्याला पुढे कसं जगायचंय .

चौथ्या स्टोन विक मध्ये तर अश्युगीन माणसे जसे राहत होती तसे राहावे का अशी इच्छा मनात येते कारण खर्च न करता कसं जगायचं हे बघावे लागते.

हेच श्रीमंतांचे बोललं तर ते वर्षातील काही महिने पार्टी करतात आणि काही महिने ते भार सहन करू शकतात .

या सर्व गोष्टीतून एवढे नक्की की चैन सगळे करतात.

पण गरजेचं पण काही सांगता येत नाही. 

चैन अनावश्यक असते , गरज आवश्यक असते.

Friday, October 30, 2020

शेती : - व्यवसाय की स्वयंरोजगार

आजवर जी शेतिबद्दलची विचारसरणी आहे त्यात घोळ असा आहे कि

 १) कम्युनिस्ट कामगारांचे हित बघते आणि ते शेतकऱ्यांना व्यावसायिक मानतात कारण त्यांच्या शेतात देखील कामगार असतात म्हणजे ते कामगार नाहीत हे पक्के असे त्यांचे मत आहे .

२) उजवी खाउजा (खाजगी,उदारी,जागतिकीकरण)  विचासरणीला शेतकरी शेतात पाहिजेत पण ते मालक म्हणून राहिले नाही पाहिजेत   कारण ते जर मालक राहिले तर हक्क हिस्सा नावाची गोष्ट तेथे  राहील  . 

आणि म्हणूनच होईल त्या मार्गाने शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्या न राहता सरकार किंवा सहकार मालकीच्या व्हाव्यात जी त्यांची गरज आहे त्यासाठी ते प्रयत्नशील असतात .

आता शेतकऱ्याची अवस्था खाजगी दुकानदारासारखी आहे दिवस काढला तर काही तरी हाती लागेल असा समज  घालून  तो मेहनत घेतो 

पण भविष्यात  त्याच्या नवमाध्यमवर्गीय वंशजांना शहरात जमीन कमी पडायला लागली तर ती भूक  शेती गिळेल एवढी नक्कीच आहे . 

अजून एक गोष्ट जी आमच्या कायम ध्यानात राहावी जोपर्यंत शेतमाल  हा शेतकऱ्यांच्या हातून आपल्याला येतोय तोपर्यंत तो तुमच्या आवाक्यात आहे . जर का एकदा शहरातील मॉल मध्ये तो कायमचा गेला तर औषधांएवढी किंमत मोजावी लागेल जेवणाला  पण .

बरच वर्षे शहरात राहून देखील आपण हे विसरू नये कि शेती हि कायम गावातच वाढणार शहरात फक्त परसबाग होईल झाली तर !!!




Monday, May 11, 2020

पृथ्वी शेषाच्या मस्तकावर आहे

लहानपणी एक गोष्ट ऐकली होती
कि वेगवेगळ्या दिशांनी पृथ्वी कोठे आहे याबाबत माहितीसाठी वेगवेगळ्या गोष्टी आहेत कोणी म्हणत होते की कासवाच्या पाठीवर, हत्तीच्या पाठीवर,
आणि आपल्याकडे कहाणी आहे की ती शेषनागाच्या मस्तकावर.
या गोष्टी भलेही काल्पनिक आहेत कारण सर्वजण विज्ञानानुसार जाणतात की सौरमाला आणि गुरुत्वाकर्षण यात पृथ्वी एक मैलाचा दगड आहे जेथे आपण राहतो.
पण या कल्पनेत एक मोलाचा सार आहे तो म्हणजे हत्ती, कासव,  शेषनाग हे जर पृथ्वीचा भार ऊचलतात तर ते पेलण्याची ताकद फक्त त्यांच्यात आहे कोणी ईतर ते पशू नाही ते पेलु शकते नाही त्यांच्या स्वभावात ते गुणधर्म आढळतात.
परिस्थिती कसलीही असो ते जे पृथ्वीचा भार वाहतात ते समाधान मानत असतात.

व्यवस्थेत जे भार वाहणारे  आहेत त्यांची संख्या तुलनेने त्यांच्यापेक्षा अधिक  आहे जे व्यवस्थापक किंवा व्यवस्थेत त्यांच्या वरच्या श्रेणीत आहेत.

संस्कृती आणि जन्म तसेच सहवास आणि अधिकार याद्वारे जे ज्या श्रेणीमध्ये पोहोचले आहेत ते परिस्थितीनुसार श्रेणी बदलतील पण भारवाहू हे नेहमीच दुर्लक्षित राहिलेले आहेत जरी ते संघटीत असतील किंवा असंघटित.

कारण व्यवस्था हे सांगते की निर्णय हे जे भार उचलतात ते घेत नाहीत कारण तो अधिकार त्यांना व्यवस्था देत नाही
ते तर व्यवस्थापकांनी केलेल्या निर्णयांना बांधील राहून सोपवलेली  कर्तव्ये पार पाडतात.
त्यांचे निर्णय बदलण्याची   क्षमता असलेल्या व्यवस्थापकाला अजून एक गोष्ट माहीत आहे ती म्हणजे त्यांच्या मनात असलेल्या प्रलोभने तसेच नाईलाज
यांची असलेली जाणीव. ही त्याला स्वतःला स्वतःचे निर्णय थोपवण्यात मदत करत असते.

अजुन एक गोष्ट म्हणजे भारवाहू हे एकत्र असतांना ते व्यवस्थेला पुरक अशाच गोष्टींचे समर्थन करतात.
(उदा.  उसतोड कामगार असो की आतंकी सैनिक ते आपापल्या व्यवस्थेविरूद्ध नाही जातात नाही ते कोणाकडून ऐकून घेऊ शकतात).

जन्म  से बैरागी जब संसार का हिस्सा होने चला तब यही कहने का अवसर मिला!!!

जब कभी धर्म और व्यवस्था के नाम पर अवडंबर होगा.
तब व्यवस्था बदली जाये ये अनिवार्य होगा!!!

कोई श्रेणी ही ना रहे ऐसा समय ही परिणाम होगा!!!
विधीविधान तुमसे जन्मे है तुम विधीविधान से नही ये आकलन हर हर महादेव की गुंज से होगा !!!

Tuesday, January 28, 2020

देवाला देव बनवणे हे कलाकारांच कर्तव्य आहे


एक गोष्ट नेहमीच वादाचा विषय बनते ती म्हणजे देव.

काही लोक म्हणतात की देवाने माणसाला बनवले तर काही ठिकाणी माणसाने ऊपासनेसाठी देव बनवले आहेत.
मुर्तीपुजक व्यवस्था अनेक नवीन देव कालानुरूप उदयास आणते.
आणि मग चालू होतो स्पर्धेचा खेळ, वेगवेगळ्या देवांच्या वेगवेगळ्या रंगापासून तर विधी सेवा पर्यंत सर्व गोष्टी ठरवल्या जातात आणि मग ते कोणत्याही परिस्थितीत आपण आपल्या आचरणात आणावे लागेल असे कडक नियम लादले जातात.
या सर्व गोष्टींचा विचार केला तर हे सगळे प्रकार माहीत असतानाही ते रितसर पार पाडले जातात कारण येथे कलाकार आणि कलेला अपरंपार महत्त्व आहे.

विधी सेवा सुरू करताना तसेच ते व्यवस्थेच्या पायथ्याशी असलेल्या जनसामान्यांपर्यंत पोहोचताना कलाकार महत्त्वाची भूमिका बजावतात.

ऊदा.  नवरात्रात 9 दिवस 9 रंग ठरवले गेले होते आणि ते कलाकारांकडून वर सांगितल्याप्रमाणे पोहोचले. काही ठिकाणी तर ते स्वतः पण त्या ठरवलेल्या रंगीत कपड्यात 9 दिवस विधीवत दिसले.
हे सहाजिकच आहे कारण येथे कलाकार हे संस्कृती जोपासताना किंवा नवी संस्कृती बनवतात आणि पैसे मिळवतात.
(Off course Artist are trend setters &  they receive money to develop culture.)

Safety Honor &  Welfare of your country comes first.