Tuesday, January 28, 2020

देवाला देव बनवणे हे कलाकारांच कर्तव्य आहे


एक गोष्ट नेहमीच वादाचा विषय बनते ती म्हणजे देव.

काही लोक म्हणतात की देवाने माणसाला बनवले तर काही ठिकाणी माणसाने ऊपासनेसाठी देव बनवले आहेत.
मुर्तीपुजक व्यवस्था अनेक नवीन देव कालानुरूप उदयास आणते.
आणि मग चालू होतो स्पर्धेचा खेळ, वेगवेगळ्या देवांच्या वेगवेगळ्या रंगापासून तर विधी सेवा पर्यंत सर्व गोष्टी ठरवल्या जातात आणि मग ते कोणत्याही परिस्थितीत आपण आपल्या आचरणात आणावे लागेल असे कडक नियम लादले जातात.
या सर्व गोष्टींचा विचार केला तर हे सगळे प्रकार माहीत असतानाही ते रितसर पार पाडले जातात कारण येथे कलाकार आणि कलेला अपरंपार महत्त्व आहे.

विधी सेवा सुरू करताना तसेच ते व्यवस्थेच्या पायथ्याशी असलेल्या जनसामान्यांपर्यंत पोहोचताना कलाकार महत्त्वाची भूमिका बजावतात.

ऊदा.  नवरात्रात 9 दिवस 9 रंग ठरवले गेले होते आणि ते कलाकारांकडून वर सांगितल्याप्रमाणे पोहोचले. काही ठिकाणी तर ते स्वतः पण त्या ठरवलेल्या रंगीत कपड्यात 9 दिवस विधीवत दिसले.
हे सहाजिकच आहे कारण येथे कलाकार हे संस्कृती जोपासताना किंवा नवी संस्कृती बनवतात आणि पैसे मिळवतात.
(Off course Artist are trend setters &  they receive money to develop culture.)

Safety Honor &  Welfare of your country comes first.