Friday, September 25, 2015

अविष्कार

                इन्सान
काले सफेद का भेद करनेवाला इन्सान!
प्रेम और तिरस्कार करनेवाला इन्सान!
अच्छाई और बुराई जाननेवाला इन्सान  !
हंसी और आँसु दिखानेवाला इन्सान !
देव और राक्षस बतानेवाला इन्सान !
जब भी बनाया बनानेवालेने आज सोचता होगा वो क्या यही है वो, जो था अविष्कारो का अविष्कार करनेवाला अविष्कार इन्सान !!!
                 ध्रुव और एकलव्य
      चलो देर से ही सही पहचान तो हुई ध्रुव और एकलव्य की दुनिया को ज्ञान का आधारपर  समाज मे स्थान प्राप्त करना और ज्ञान अहंकार ना होना यही हमारा आदर्श  हो
किसी के हो न हो हमारे लिए तो वो आदर्श ही रहेंगे
        देव और ऋषी
आज तक का ईतिहास उठा के देखो
वरदान हमेशा देवो ने दिये और शाप हमेशा ऋषीयो ने ,शायद इसिलिये सामान्य मनुष्य दुसरो मे भगवान ढूंढता है ऋषी नही
मतलब ज्ञान के साथ जिसके पास दुसरो का भला करने का नजरिया जरुरी होता है
           धर्म  - पुर्वपश्चिदक्षिणौतर
गोतास काळ असे माणसे आपल्याच धर्मात बघायला  मिळतात कारण प्रत्येक माणसाला स्वतःचा तात्त्विक विचार करण्याची मुभा येथे आहे .ते तत्त्व जगासमोर मांडण्याची तसेच इतरांचे तत्त्व  पटत नसल्यास त्या  बाजूला सारण्याची मुभा येथेच आढळते , म्हणूनच कि काय  वर्धमान महावीर (जैन ),गौतम बुद्ध (बौद्ध ), गुरू नानक(शीख ) यांनी त्यांच्या तत्वांचा धर्म बनवला पण त्यांनी किंवा इतरांनी त्यांचा तात्त्विक धर्म प्रत्यक्षरित्या लादल्याची कोठेही नोंद नाही. आणि ते ज्या धर्माच्या उणिवा शोधून त्यांच्या तात्त्विक धर्मात सामील झाले त्या धर्मालाही (हिंदू , वैदिक ) कोठेही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या हानी पोचावाल्याचे आढळत नाही वा अप्रत्यक्षरित्या हानी पोचावाल्याचे आढळत नाही .पण पाश्चिमात्य देशात उगम पावलेले धर्म हे (जेरुसलेम प्रदेश) मुळातच प्रसारासाठी आग्रही होते म्हणूनच मध्ययुगात मिशनरी, मदरशे यांनी त्या धर्माचा कडवा प्रचार केलेला आढळतो .

Wednesday, September 9, 2015

राजे राज्य तेव्हाच करतील जेव्हा मावळ्यांमध्ये जिव्हाळा असेल

       


        या दंडकारण्यात अनेक राजे जन्मले आणि राज्य करून त्यांच्या गोष्टी ,कहाण्या मागे सोडून गेले
पण तरीही फार क्वचितच आहेत जे सर्वांच्या मनात घर करून गेले .
        साम ,दाम, दंड, भेद  या माणसाने व्यवहारासाठी आखून ठेवलेल्या रेषा आहेत.
या दंडकारण्यात दामाने व्यापारी आणि भेदाने पुजारी राज्य करून गेले, दंड या राज्याचा पाया आहे म्हणून दंडाचे राज्य चालूच राहील, पण जो येथे सामावादासाठी संवाद साधतो त्याची गरज नेहमीच राहिली आणि राहीलही.  
       तसेच दंडाने आणखी एक गोष्ट साध्य झाली आहे ती म्हणजे उठाव , सत्तेत असणाऱ्या विरुद्ध उठाव करणाऱ्यांची येथे कधीच उणीव भासली नाही म्हणजे दंडकारण्य बदलास कारणीभूत ठरते. पण जर आजच्या जगाची गोष्ट असेल तर लोक आता तुमच्या मागे किती आहेत या पेक्षा तुमच्या सोबत किती आहेत हे बघतात आपल्यासारखे जीव निर्माण करण्याची जाणीव आपल्याला  निर्मात्याने दिली आहे पण आपल्यासारखे माणसे निर्माण करण्याची जाणीव आज आपल्याला नसावी हि बाब  तर्कशास्त्रात बसत नाही विचारांनी भाजी भाकरी मिळत नाही त्यासाठी कष्टच  करावे लागतात हि गोष्ट जरी खरी असली तरी माणसाने कसे आणि कशासाठी जगावे हे शिकवणे गरजेचे होते म्हणून या रूढी, प्रथा ,परंपरा जिवनात आल्या तरीही वाईट जुन्या चालीरीती टाकून देऊन नवीन रिती शिकणे तसेच आदर्श गोष्टी पुढे चालू ठेवणे म्हणजे प्रबोधन,प्रबोधन हि एक आवर्त संकल्पना आहे जसे विज्ञानात कोणतीही गोष्ट अंतिम सत्य नाही तसेच प्रबोधनहि कधी थांबणार नाही.  आज आपण global village हि संकल्पना ऐकतो तेव्हा आपण असे मानू कि आज जगाला जोडणारे जगाचे राजे आहेत भले प्रत्येक देश स्वतःच्या राजाला प्रधानमंत्री , हुकुमशहा,राजा, सम्राट काहीही उपमा देवोत पण जर त्यांनी जगाशी संबंध तोडण्याचे प्रयत्न केले तर त्यांना जमिनीवर आणण्याची ताकद आता सर्वसामान्यामध्ये आज आहे आणि जरी राजेशाही पुन्हा आली तरी राज्यक्रांतीला सोबत घेऊनच येईल
म्हणून जर सर्व जनतेत राजाबद्दल जिव्हाळा असेल तोवर तो राजा राहील
आज एवढेच
जय हिंद !!! जय महाराष्ट्र !!!
शिवम प्रल्हाद तौर
राहणार: शेलगाव  तालुका: माजलगाव  जिल्हा: बीड  राज्य :महाराष्ट्र  देश: भारत
वसुन्धरैव कुटुम्बकम