Friday, October 30, 2020

शेती : - व्यवसाय की स्वयंरोजगार

आजवर जी शेतिबद्दलची विचारसरणी आहे त्यात घोळ असा आहे कि

 १) कम्युनिस्ट कामगारांचे हित बघते आणि ते शेतकऱ्यांना व्यावसायिक मानतात कारण त्यांच्या शेतात देखील कामगार असतात म्हणजे ते कामगार नाहीत हे पक्के असे त्यांचे मत आहे .

२) उजवी खाउजा (खाजगी,उदारी,जागतिकीकरण)  विचासरणीला शेतकरी शेतात पाहिजेत पण ते मालक म्हणून राहिले नाही पाहिजेत   कारण ते जर मालक राहिले तर हक्क हिस्सा नावाची गोष्ट तेथे  राहील  . 

आणि म्हणूनच होईल त्या मार्गाने शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्या न राहता सरकार किंवा सहकार मालकीच्या व्हाव्यात जी त्यांची गरज आहे त्यासाठी ते प्रयत्नशील असतात .

आता शेतकऱ्याची अवस्था खाजगी दुकानदारासारखी आहे दिवस काढला तर काही तरी हाती लागेल असा समज  घालून  तो मेहनत घेतो 

पण भविष्यात  त्याच्या नवमाध्यमवर्गीय वंशजांना शहरात जमीन कमी पडायला लागली तर ती भूक  शेती गिळेल एवढी नक्कीच आहे . 

अजून एक गोष्ट जी आमच्या कायम ध्यानात राहावी जोपर्यंत शेतमाल  हा शेतकऱ्यांच्या हातून आपल्याला येतोय तोपर्यंत तो तुमच्या आवाक्यात आहे . जर का एकदा शहरातील मॉल मध्ये तो कायमचा गेला तर औषधांएवढी किंमत मोजावी लागेल जेवणाला  पण .

बरच वर्षे शहरात राहून देखील आपण हे विसरू नये कि शेती हि कायम गावातच वाढणार शहरात फक्त परसबाग होईल झाली तर !!!