Saturday, February 6, 2021

मध्ययुगाकडे वाटचाल -

पूर्वकल्पना: 
___________________________________________________________________________________
नवरत्नांचे राज्यासाठी  काय योगदान असते ते आज बघायला मिळाले . जुन्या मुघल शासनात नवरत्न हे विविध कला क्षेत्रातून असायचे आणि ते बाकी काही करो किंवा नाही  पण राजाची जीहुजुरी त्यांचे प्रथम कर्तव्य होते . 
आज सद्यपरिस्थितीत  भारत हा अंतर्गत संकट आणि बंडाच्या उंबरठ्यावर कसा आहे हे जगाला माहित आहे असे जर कोणी म्हणाले तर त्यात वावगे असे काही नाही . पण भारतीय नवरत्न अशी काही परिस्थितीच नाही असे आवेशाने सांगत असतील तर ते त्यांच्या पदाचा मान ठेवत आहेत असेच म्हणावे लागेल . 
यात कोणीही चुकीचा प्रचार करत नाही पण हा भारताचा अंतर्गत वाद आहे ,पण त्याचे कारण सरकारी धोरण आहे ,भारतीय एकात्मता आणि भारतीय संस्कृती ह्यांचा संबंध येथे लावला जाऊ शकत नाही . 

आणि ज्याप्रमाणे यापूर्वीही अनेकदा विरोधात भूमिका घेणारे देशद्रोही ठरवले गेले त्यात अजून काही लोकांची भर पडली असेच आहे .
पण यावेळी मुद्दा हा व्यवसाय , जीवशैली , धर्म, जात नसून जमीन हा आहे . जोपर्यंत जमीन ताब्यातून घेतली जात नाही तो पर्यंत कुळ शेती करत राहील . 
पण काही कायद्यांनी जमीन ही अप्रत्यक्षपणे का होईना एका जटिल संघटनेस वापरण्यासाठी दिली जाणार आहे . 
ह्याने काय होईल ते आम्ही वेगळे सांगायची गरज नाही . 
आज आम्हाला माहित आहे उतरंड कशाला म्हणतात . (इंग्रजीत त्याला organization असे गोंडस नाव आहे) . 
आणि कुळांचे व्यवस्थेतील स्थान काय होते तेही आपण सगळे जाणतो . 
प्रसंग आधीच हाताबाहेर गेलेला असताना तो निवळण्यासाठी प्रयत्न करावं का ढवळण्यासाठी तो प्रसंग दुर्लक्षित करावा हे सरकारला सूचित करणारे आमचे काम आहे ते आम्ही करत राहू . 
बाकी सरकार आणि राजा हे अनेक दुय्यम मंत्री मंडळा ने भरलेल्या संसदेत हवे ते करण्यास पात्र आहे .