Friday, November 13, 2020

गरज आणि हौस

 काल माणूस जे करून बसतो आणि मागे वळून बघतो पण  फक्त त्या  क्षणाचा आनंद  दिसतो ती हौस असते आणि आज जी माणसासमोर उभी राहून त्याला विचार करायला लावते ती गरज असते . सामान्य माणसांसाठी हा समजेल असा फरक आहे.

आपण किती जरी बोललो की चैन हा श्रीमंतांचा विषय असतो तरी आपली cycle वेगवेगळ्या असतात गणित एकच असते.


जसे की नवामध्यमवर्गिय लोक जगतात त्यात पगारी नंतर पहिला आठवडा हा गोल्डन विक असतो म्हणजे पैसा दिसण्यापासून तर पार्टी पर्यंत सर्व गोष्टी ह्या आठवड्यात होतात.

दुसरा आठवडा म्हणे सिल्व्हर विक यात पैसा सन्मार्गाला लागतो तो म्हणजे loan saving emi ह्या गोष्टी आम्ही या आठवड्यात आणून ठेवलेल्या असतात .

तिसरा आठवडा हा कॉपर विक जवळपास पैसा संपत आलेला असतो आणि माणसाला कळतच नाही की आपल्याला पुढे कसं जगायचंय .

चौथ्या स्टोन विक मध्ये तर अश्युगीन माणसे जसे राहत होती तसे राहावे का अशी इच्छा मनात येते कारण खर्च न करता कसं जगायचं हे बघावे लागते.

हेच श्रीमंतांचे बोललं तर ते वर्षातील काही महिने पार्टी करतात आणि काही महिने ते भार सहन करू शकतात .

या सर्व गोष्टीतून एवढे नक्की की चैन सगळे करतात.

पण गरजेचं पण काही सांगता येत नाही. 

चैन अनावश्यक असते , गरज आवश्यक असते.