Sunday, October 15, 2023

ऐसा संतांचा महिमा झाली बोलायची सीमा

 आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे !!

ऐसा संतांचा महिमा झाली बोलायची सीमा!! (संत तुकाराम).

देवा देवपण देणे हे कलाकारांचे असे कर्तव्य ,

संतांची संगती ठरवी देवाचं गंतव्य .

विठ्ठल रुखमाचे मुले चार मुक्ता ज्ञाना सोपा निवृती यांचा सोपा विचार .

नरसी ते घुमान नामा फडकविली पताका ,पाथरी ते शिर्डी गेली साईची नौका.

भंडारा डोंगरी तुका गाई भागवत , एकनाथ पैठणचा असे दत्ताचा भक्त .

जांब समर्थाचे भांडवल हे मन  , देवगिरी जनार्दन पुजे दत्तध्यान .

भजे विष्णू, शिव, शक्ती आणि नाथजन, अखंड ज्यांची कीर्ती लाभले कलियुगी भोळेपण . 

करती जे वर्तमानाचे उत्तम आकलन आणि घडवी नाम संकीर्तन.

मीरा , गोरा, चोखामेळा , सावता, नरहरी अन् निळा.

जीवनी ज्यांनी रचिला नाम सोहळा.

आजच्या गणांना नाही उरला फार  वेळ , सार त्यासाठी मनाचे श्लोक आणि हरिपाठ सरळ .

म्हणे कुसुमाग्रज शिवा , ध्यानी ठेवावा हा ठेवा .

गायिलेल्या कथा "गाथासार" नामासाठी जपावा.



No comments:

Post a Comment