Sunday, October 22, 2023

यहुद आणि हूनुद - शेतकरी आणि क्षत्रिय

जर आजच्या जगात शांततेत असताना शेती आणि युद्धात असताना योध्दा असे कोणी देश सापडण्यात आले तर ते इस्राईल आणि भारत असतील कारण या प्रांतात जे बहुसंख्य गण आहेत ते स्वतःला सर्वप्रथम या मातीचा अंश मानतात जन्मभूमी (motherland) ही गोष्ट याच लोकांना माहीत आहे .
ते इतर पंथाना योग्य मान्यता आणि वागणूक देतात .
सन्मान मग तो आत्मसन्मान असो की अतिथी सन्मान तो याच देशात विशेष करून बघायला मिळतो.सर्व बाजूंनी या दोन्ही देशांना शेजारी हे नालायक मिळाले आहेत जे या ना त्या कारणाने वाद कायम ठेवत असतात.


एक साधा फरक आहे तो म्हणजे भारतीय गणराज्य जिथे जिथे होते ते सर्व प्रदेश आजही भारतीय जनता म्हणूनच भारतियांना पाहतात म्हणूनच सिंगापूर, थायलंड , कंबोडिया, इंडोनेशिया , मॉरिशस हे आजही भारतीय लोकांना आपलेच मानतात कारण पूर्वी दर्शन फक्त दोष आणि दिशा दाखवते ज्याने त्याने पटेल ते घ्यावे हे मूलभूत अधिकार आहेत.तसेच आम्ही निसर्गाचा कौल मानतो 

याउलट जेरुसलेम मध्ये उद्भवलेल्या सर्व दर्शन जे आहेत त्यांना थोपण्याची एक जुनी परंपरा आहे.इथे नेहमीच निसर्गाची अव्हेलना होत राहते म्हणून की काय इथेच सर्वात जास्त युद्ध झाले आहेत. तसेच सगळ्या जुन्या संस्कृती इथून नष्ट झाल्या आहेत म्हणून यहुदी आजही अनेक वेळा पूर्ण जगाशी संबंध ठेवतो पण आपली जन्मभूमी त्याला सगळ्यात महत्वाची.
जर जगाला अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा कमीत कमी कार्यात पाहिजे असतील तर हे दोन्ही देश जगले पाहिजेत त्यांच्या सर्व ताकदीनिशी. 

No comments:

Post a Comment