Tuesday, June 27, 2017

दोन वेळेसाठी लढनार्यांचा धर्म तो कोणता

 अन्न, वस्त्र , निवारा या मानवाच्या मुलभूत गरजा आहेत आणि धर्म, अर्थ, काम हे माणसाने माणसासाठी एका विशिष्ट हेतू साठी निर्माण केलेल्या व्यवस्था आहेत त्यात मुलभूत हेतू आहे तो म्हणजे माणूस हा अनुकरणशील प्राणी आहे , तसेच तो समाजशील सुद्धा आहे , म्हणजे तो एक तर पंचज्ञानेन्द्रियाने जे साठवतो ते तो परत वापरू शकतो आणि त्याला कळपात राहायची सवय आहे म्हणून तो इतर जंगली पशु तसेच निर्विकार पाळीव पशु या पेक्षा वेगळा आहे याची नेहमी जाणीव राहावी यासाठी प्रत्येक वेळी काल ,वेळ, स्थळ, इत्यादी  यांचा  विचार करून संहिता बनविल्या गेल्या त्यात व्यवस्था कशी चालवली जावी कोण कशा प्रकारे कोणत्या प्रसंगी पुढाकार आणि माघार घ्यावी (कारणासहित)  आणि त्या व्यवस्थेत धर्म , अर्थ , काम यांची सांगड घातली गेली. 

सुखस्य मूलं धर्मः , धर्मस्य मूलं अर्थः |
अर्थस्य मूलं राज्यं , राज्यस्य मूलं इन्द्रिय जयः ||
इन्द्रियाजयस्य मूलं विनयः, विनयस्य मूलं वृद्धोपसेवः |||
वृद्धोपसेवाय विग्न्यानं , विग्न्यानेनं आत्मानं सम्पद्येत
समपदितात्म जितात्मम भवति, जितात्मा सर्वार्थे संयुज्यते ||||

सुख का मूल धर्म है. धर्म का मूल अर्थ है. अर्थ का मूल राज्य है. राज्य का मूल इंद्रिय विजय है.
आणि इंद्रिय विजय म्हणजे काम विजय (काम या शब्दाचा अर्थ पंच्ज्ञानेद्रियांची हौस कारण जी भागवली जात नाही ती हौस असते ) त्याच मूळ विनय ,वृद्धांची सेवा,विज्ञान ज्याने आत्मा जितात्मा होऊन पावन होतो 
आता सुख नावाच्या गोष्टी साठी काय काय लागते हे वर दिले आहे 
पण सुख म्हणजे नेमके काय असते हे कळण्यासाठी अन्न , वस्त्र , निवारा या मुलभूत गरजा पूर्ण होणे आवश्यक आहे. जर त्यासाठीच एखाद्याची सर्व उर्जा खर्च होत असेल तर तो वरील कोणत्याही गोष्टीचा विचार करत नसावा.
नव्हे त्याला किंचितही फरक पडत नसावा आणि व्यवस्थाही त्याचा विचार करीत नाही असा त्याचा वैक्तिक समाज असेल. कारण व्यवस्था फक्त दोन स्थान देते भाग अथवा शिकार जे माणसे व्यवस्थेचा भाग असतात ते जून आहे ते चालू राहावे या साठी आग्रही असतात आणि जे लोक शिकार असतात ते या लोकांकडून सहानुभूती प्राप्त करत असतात कारण मूळ हे तटस्थ असले तरी नवीन काही तरी अनुकरणीय असले कि मनुष्य प्राणी मागे पुढे जास्त बघत नाही .

पण एक गोष्ट  मात्र  खरी आहे व्यवस्था आली कि मक्तेदारी नावाचा प्रकार दिसून येतोच . आजच्या काळात न्याय,संरक्षण,शासन,अर्थ,माध्यम,ह्या नवीन व्यवस्था आहेत आणि त्यातही जाणीवपूर्वक मक्तेदारीला आमंत्रण दिले जाते, आणि या कोणत्याही व्यवस्थेत नसणारे ते आहेत आमचे तटस्थ, दोन वेळेसाठी लढणारे , फक्त विचारंनी भाजी भाकरी मिळत नाही त्यासाठी कष्टच करावे लागतात हे ठासुन सांगणारे !
त्यांना हे व्यवस्थेतील मक्तेदार कधी आपुलकी दाखवतात अन व्यवस्थेत घेतात तर कधी तुच्छ वागणूक देऊन शिकार बनवतात अन मग चक्र पुन्हा चालू राहते जो व्यवस्थेत गेला तो व्यवस्थेचे गोडवे गोता अन  जो शिकार झाला तो व्यवस्थेला शह देण्याची वात पेटवून व्यवस्थेपर्यंत ती आग पोचण्याची वाट  बघतो.
यात कितीही विचार केला तरी आपण या तटस्थ लोकांचा सुखामागचा मूळ हेतू धर्म नाही सांगू शकत 
जे काही औपचारिक धर्म या नावाने चालणारे गडे आहे त्या संहिता माणसाने बनवल्या यात कुठेही दुमत नसावे त्यामागे दोन मूळ कारणे १) जुना अनुभव 2) वर्तमान परिस्थिती या दोन गोष्टी संहिता लिहितांना हाताळल्या जातात अन नेहमी  शिकार झालेले लोकच त्यावर विश्लेषण करून बदलाची मागणी करतात हे प्रत्येक संहितेचे विशेष म्हणावे लागेल कारण प्रत्येक संहितेने भविष्यासाठी काही नसेल केले पण हे व्यवस्थेचे शिकार त्या मूळ हेतूचे कार्य साध्य करतात म्हणजे माणसाच्या मूळ स्वभावातच ते रुजलेले आहे असे म्हणावे लागेल 
बाकी शेवटच्या ओळी तथाकथित बुद्धीजीवी अन अनुयायी लोकांसाठी 



" कभी मनुने  लिखी थी संहिता कभी भीमराव ने लिखा था संविधान पार आज भी सरकारी व्यवस्था मी चार हि स्तर (क्लास) है और बिगरसरकारी (अतिशूद्र ) तो गिनती मे भी नाही आते   तो बताओ कोनसी व्यवस्था बदली कोनसा समाज बदला न व्य्वस्था बदली न बदला समाज बदला तो बस व्यवस्था मी तुमारा स्थान !!!"


शिवम प्रल्हाद तौर
राहणार: शेलगाव  तालुका: माजलगाव  जिल्हा: बीड
राज्य :महाराष्ट्र  देश: भारत
वसुन्धरैव कुटुम्बकम   

No comments:

Post a Comment