Sunday, June 18, 2017

व्यवस्था : एक श्रेणी बद्ध रचना

व्यवस्था ही एक श्रेणीबद्ध रचना आहे आणि त्यातील श्रेणी आणि श्रेणीचे स्थान खालील पद्धतीने ठरवले जाते

१) प्रमाण : वेळ ,पैसा, श्रम, ज्ञान याच्या प्रमानावरून श्रेणीतील स्थान ठरते

2) समावेशाचा काल: जो जितक्या अगोदर श्रेणीमध्ये समाविष्ट झाला तो तितक्या लवकर श्रेणीचे स्थान पक्के करत जातो.त्यात वर दिलेले मुद्दे ठरावास कारणीभूत ठरतात

३) वंश , वडिलोपार्जित कर्म : वाडवडिलांनी ज्या श्रेणीत काम केले त्या श्रेणीत वंशज काम करत राहील असा एक प्राथमिक समज आहे तरी एखादा वंशज पाहिजे तेव्हा आप्तांचा रोष पत्करून तसेच सहानुभूती आणि दरारा यांच्या जोरावर श्रेणी व स्थान बदलू शकतो

४)महत्त्वकान्क्षा : जर सर्व व्यवस्था एके ठिकाणी काही परिस्थितीमुळे एका माणसाकडे आकर्षित होत असेल तर त्या माणसाची मह्त्वकान्क्षा ठरवते कि तो अन त्याची श्रेणी कोठवर जाऊ शकते

५) पर्यायी श्रेणी : पर्यायी श्रेणी तयार झाल्यास बहुतेक लोक त्या श्रेणीमध्ये समाविष्ट होण्याचा प्रयत्न करतील आणि जुन्या श्रेणी नष्ट करण्याचा प्रयत्न करतील पण उरलेले लोक जुन्या श्रेन्यांना चिटकून राहतील.

६)व्यवस्था डळमळीत होणे किंवा अतिप्रासंगिक होणे   : हा रचनेचा शेवटचा पण निर्णायक भाग जेव्हा व्यवस्थेतील सर्व लोक एकमेकांवर अवलंबून आहेत याची जाणीव सर्वांना झालेली असेल तसेच प्रसंगानुसार कोणीही कधीही श्रेणी आणि स्थान बदलत राहील आणि काही तथाकथित विचारवंत व्यवस्था बनवानार्याला कशी अक्कल नव्हती हे सिद्ध करायला जीव खर्ची घालतील आणि सर्व श्रेन्यांतून त्यांना संमिश्र प्रतिक्रिया मिळतील



पण एक गोष्ट मात्र कोनिहि विसरता कामा नये

" व्यवस्था न बदली हे, न बदलेगी ,बदलेगा तो बस  व्यवस्था मे तुम्हारा स्थान "!!!


No comments:

Post a Comment