Tuesday, March 19, 2024

ध्येय आणि तत्व

जाहिरात आणि त्यांचं ध्येय
आज आपण ध्येय आणि तत्व या दोन गोष्टी आणि त्यांचे जीवनात महत्व बघुयात . वर दिलेल्या लिंक मध्ये सुधांशू त्रिवेदी नावाच्या व्यक्तीने हे काही क्षणात मांडले आहे की सर्व जगात फोफावलेल्या डाव्या विचरसरणीच्या मतांचे ध्येय काय आहे . 
कलियुगी बुद्धिभेद हे साधन आहे तर सर्व गोष्टी बुद्धिभेद करून तुमचे जीवन विस्कळीत करणाऱ्या ह्या डाव्या बाजूच्या पद्धतीचे आपण होईल तेवढे कमीच आकलन आणि अनुकरण करावे .
आजच्या जगात मी आधी मंडल्याप्रमाने भांडवलशाही , समाजवादी आणि तिसरी व्यवस्था जी अलिप्ततावादी आहे त्यात आपण व्यापाऱ्यांचा देश अमेरिकेला कधीही दूर सारून वाचू शकत नाही कारण भलेही कॉलनीचे ते समर्थक असतील पण देश आणि लोकशाही हे तिथे भांडवलदारी पद्धतीत ते सर्वव्यापी आहेत .
आणि समाजवादाचा भूगोल नेहेमीच दुटप्पी आहे .
जेव्हा तत्वांचा विचार केला , तेव्हा पुतीन यांनी भारताला आपला वेळ युद्धकाळातही दिला हे तत्ववादी डावे विचार आणि चीन सारखा देश आपल्या समाजवादाचा वापर दुसऱ्या देशांना सावकारी काय असते ते समजून सांगत आहे हे ध्येयवादी डावे विचार . 
तसाच तत्व आणि ध्येय उजव्या बाजूलाही आहे की कोणीही आमचा विरोधक नसतो जोपर्यंत तो आपल्याकडून काहीतरी देवाण घेवाण करत असतो . जर ध्येय बोलाल तर सकारात्मक विकास आणि उपभोक्तावाद ह्यात शेवटचा उपभोक्ता ही सामील व्हावा ही त्यांची प्रबळ इच्छा असते.
आता त्याच सुधांशू त्रिवेदी यांनी भारताची अर्थव्यवस्था कशी चालते त्यासाठी हे वाक्य वापरले होते
 "जो आया है वो खायेगा, जो कामायेगा वो खीलायेगा, इसलिये बडा सेठ वो नही होता जो पैसा बहुत रखे , बडा सेठ वो माना जाता है जो दान सबसे ज्यादा दे ."
ये लेफ्ट पीक थिअरी सिर्फ भारत में चलती है किसी aur देश में नहीं.
म्हणून जिथे जिथे तत्व अजूनही टिकून आहेत तिथे प्रेम, आपुलकी, जिव्हाळा ह्या गोष्टी काल्पनिक नाहीत पण जिथे ध्येयासाठी तत्व वाया गेले तिथे उभे आयुष्य कृत्रिम असल्यासारखं वाटत असतं. बरेच जण विदेशात जाऊन , तिथे स्थायिक होऊन आत्महत्या केल्याचे कळते कारण जीवनात असलेलं कृत्रिमपण, आणि संस्कृतीचा उपद्व्याप . 
जसे वरील व्हिडिओ च्याच लिंक मध्ये सांगितलं आहे. कौटुंबिक जीवनपद्धती राखून ठेवण्यात आपल्याला यश आले तर ठीक नाहीतर , मिळालेलं स्वातंत्र्य भाकरीच्या सोयीलाच आहे बाकी काही नाही.



No comments:

Post a Comment