Friday, November 15, 2024

अर्जुन तू लढ , मा फलेषु कदाचन |

काल परवा एक सदगृहस्थ  भेटले नागपूरकर होते , मी सहज त्यांना विचारले निवडणुकीला इथेच का गावाकडे जाणार . तर काही कन्फर्म नाही असे उत्तर आले मग कुतुहलाने मी  विचारले की मतदान इथले आहे का गावाकडचे तर दोन्ही कडे दोघांचे आहे असे उत्तर आले . 
मग एक इथे आणि एक तिथे असे म्हटल्यावर काही तरी एक निर्णय घ्यावा म्हणून मी बोललो इथेच करा गावाकडे कशाला जाता ?? तर गावाकडे या निमित्ताने तरी विचारतात जर आत्ता नाही गेलो तर पुढे विचारणारे कमी होतील राहनार नाहीत असे उत्तर आले . मग मी  बोललो गावाकडे जा , हा ते तर जाऊ पण कोण होणार मुख्यमंत्री कोणाला द्यायच मतदान कोणी के लागल रिजल्ट ,  मी आपल्या विनोदी शैलीत बोललो कोणीच पक्का सरकार नाही बनणार आणि आजवर तुम्ही न बघितलं न ऐकले असा चेहरा तुमच्यासमोर असेल . 
ते कोण्या एक पक्षाचे निष्ठावान असतील तर ते काही बोलतील या उद्देशाने मी बोललो . 
मला जायला 12 तास लागतील आणि मी सकाळी नाही निघू शकणार तर मी बोललो मग रात्री निघा . तर घराचे मानस रात्री नाही म्हणतात स्वतची गाडी आहे तर दिवासचाच प्रवास बरा असे त्यांनी सांगितले. 
तर मला जशी माहिती आत्तापर्यंत मिळाली त्यावरून मी बोललो मग गावकडेच जा जर तुम्ही त्या गावात संपर्क ठेवू इच्छित असाल नाही तर इथे थांबून इथे द्या मतदान . 
मग इथे कोणले द्यायच ?? 
असे जेव्हा मला विचारले तर मीही निष्पक्ष पणे कोणालाही द्या पान द्या आणि कुठे तरी मतदान करा आणि आपला कर्तव्य  बजावा .

तसे पाहिले तर मतदान हा हक्क पण कर्तव्य सुद्धा . 
आणि कोण येईल कोण नाही येणार या फलापेक्षा   सोडून जसे अर्जुन एक योद्धा म्हणून कुरुक्षेत्रात लढला तसे एक मत देऊन तुम्ही ही तेवढेच मोठे काम करताय असे समजा . 


No comments:

Post a Comment