Friday, February 16, 2018
सहस्त्रावधी समुदाय आणि माहिती प्रवाह
Tuesday, June 27, 2017
दोन वेळेसाठी लढनार्यांचा धर्म तो कोणता
राहणार: शेलगाव तालुका: माजलगाव जिल्हा: बीड
राज्य :महाराष्ट्र देश: भारत
वसुन्धरैव कुटुम्बकम
Sunday, June 18, 2017
व्यवस्था : एक श्रेणी बद्ध रचना
१) प्रमाण : वेळ ,पैसा, श्रम, ज्ञान याच्या प्रमानावरून श्रेणीतील स्थान ठरते
2) समावेशाचा काल: जो जितक्या अगोदर श्रेणीमध्ये समाविष्ट झाला तो तितक्या लवकर श्रेणीचे स्थान पक्के करत जातो.त्यात वर दिलेले मुद्दे ठरावास कारणीभूत ठरतात
३) वंश , वडिलोपार्जित कर्म : वाडवडिलांनी ज्या श्रेणीत काम केले त्या श्रेणीत वंशज काम करत राहील असा एक प्राथमिक समज आहे तरी एखादा वंशज पाहिजे तेव्हा आप्तांचा रोष पत्करून तसेच सहानुभूती आणि दरारा यांच्या जोरावर श्रेणी व स्थान बदलू शकतो
४)महत्त्वकान्क्षा : जर सर्व व्यवस्था एके ठिकाणी काही परिस्थितीमुळे एका माणसाकडे आकर्षित होत असेल तर त्या माणसाची मह्त्वकान्क्षा ठरवते कि तो अन त्याची श्रेणी कोठवर जाऊ शकते
५) पर्यायी श्रेणी : पर्यायी श्रेणी तयार झाल्यास बहुतेक लोक त्या श्रेणीमध्ये समाविष्ट होण्याचा प्रयत्न करतील आणि जुन्या श्रेणी नष्ट करण्याचा प्रयत्न करतील पण उरलेले लोक जुन्या श्रेन्यांना चिटकून राहतील.
६)व्यवस्था डळमळीत होणे किंवा अतिप्रासंगिक होणे : हा रचनेचा शेवटचा पण निर्णायक भाग जेव्हा व्यवस्थेतील सर्व लोक एकमेकांवर अवलंबून आहेत याची जाणीव सर्वांना झालेली असेल तसेच प्रसंगानुसार कोणीही कधीही श्रेणी आणि स्थान बदलत राहील आणि काही तथाकथित विचारवंत व्यवस्था बनवानार्याला कशी अक्कल नव्हती हे सिद्ध करायला जीव खर्ची घालतील आणि सर्व श्रेन्यांतून त्यांना संमिश्र प्रतिक्रिया मिळतील
पण एक गोष्ट मात्र कोनिहि विसरता कामा नये
" व्यवस्था न बदली हे, न बदलेगी ,बदलेगा तो बस व्यवस्था मे तुम्हारा स्थान "!!!
Sunday, April 30, 2017
सहानुभूती किंवा दहशत :रहस्यांचा समुद्र शिवा Sympathy or Terror :Shiva the Ocean of Secrets
जेव्हा मनुने संहिता बनवली, तेव्हा शिवा भोला सांब होता त्याने सुरुवातीला तिच्याशी जुळवून घ्यायचे ठरवले कारण तो एक कृषक होता ,निर्माण कर्ता होता म्हणून त्याला सहानुभूतीची गरज होती म्हणून त्याने हि व्यवस्था स्वीकारली. म्हणजे, शिवा(सांब शंभो )-निर्माण-सहानुभूती -जुळवून घेणे. हा प्रकृतीचा नियम आहे म्हणजे उत्पादक कृषक जो आहे त्याला सहानुभूतीची सगळ्यात जास्त गरज आहे . कारण तो निर्माण कार्य करत असतो आणि त्याचे परिणाम सर्वांच्या जीवनावर होतो तोही चांगला .
आता शिवाच्या दुसर्या रुपाकडे लक्ष देऊ शिवाने जुळवून घेण्याचा खूप प्रयत्न केला ,पण व्यवस्था जेव्हा सहानुभूती देते तेव्हा त्याला अनेक समस्या निर्माण करते,हे त्याच्या लक्षात आले मग त्याचेच रुपांतर झाले ते समोरे जाण्याला म्हणजे व्यवस्थेत ज्या काही समस्या त्याला दिसू लागल्या ,त्याला त्याने सामोरे जायचे ठरवले आणि स्वतःची दहशत निर्माण केली तिचे कारण ज्या समस्या त्याला समोर येतील त्याचा नाश करन्यासाठी म्हणजे शिवा (रुद्र भैरव )-नाश -दहशत -सामोरे जाने
पर्यायाने आपण म्हणू शकता कि शिवा जेव्हा सांब रुपात होता त्याला सहानुभूती मिळाली ,पण त्याची हार त्यातच आली आणि शिव जेव्हा रुद्र रुपात आला तेव्हा त्याच्या दहशतीने त्याला जीत मिळवून दिली
यातून हे लक्षात येते कि
शिवा(सांब शंभो )-निर्माण-सहानुभूती-जुळवून घेणे-हार(व्यवस्थेचा भाग)
शिवा (रुद्र भैरव )-नाश -दहशत -सामोरे जाने-जीत(व्यवस्थेचा शिकार )
ज्या माणसाला काही नवीन निर्माण करण्याची इच्छा आहे त्याने सर्वांची सहनिभूती प्राप्त करणे योग्य आहे आणि तो माणूस व्यवस्थेचा भाग असला पाहजे
जो माणूस व्यवस्थेचा शिकार झाला आहे तो स्वतःची दहशत निर्माण करून व्यवस्था नष्ट करण्या साठी कार्यरत असतो
There are two forms of Shiva in the Purana, one is named Bhola Samb or Shambho and the other is Rudra or Bhairav.
When Manu made a code, Shiva Bhola was a Sambha, he initially decided to adapt to that because he was a farmer, so he needed sympathy, so he adopted this arrangement, that is Shiva (Samb Shamba) - Creation-Sympathy-Follw. That is, the productive farmer who is most needed for sympathy. Because it is working on the construction and its effects are on everyone's life, even better
Now Shiva tried to adapt to another form of Shiva, but when the system gave sympathy, he realized that it would create many problems. Once he got converted, he decided to face any problems that he had seen in the system and his own panic The problem that caused him will cause him to come to the front To destroy him, Shiva (Rudra Bhairav) -Destruction-Terror-Face
Alternatively, you can say that Shiva was sympathetic when he was Sambhu, but his defeat came in and Shiva gave him victory when he came in Rudra
From this it realizes that
Shiva (Samb Shamba) - Creation - Sympathy-Follow-Defeat (Part of the system)
Shiva (Rudra Bhairav) -Destruction -Terror-Face-Victory (system hunting)
The person who wants to create something new is the right person to be able to take care of everyone and it is a part of the system.
The person who is hunted by the system is working to create panic by destroying the system
THIS IS BINARY PHILOSOPHY
EITHER FACE OR FOLLOW
EITHER GET SYMPATHY OR TAKE THE HELP OF TERROR
EITHER CREATE SOMETHING OR DESTROY WHICH ISN'T NEEDED
THEN YOU WILL GET VICTORY OR DEFEAT
BE A SHAMBHO OR RUDRA
शिवम प्रल्हाद तौर
राहणार: शेलगाव तालुका: माजलगाव जिल्हा: बीड
राज्य :महाराष्ट्र देश: भारत
वसुन्धरैव कुटुम्बकम
Saturday, February 11, 2017
आधुनिक वनवास (स्थलांतर, वसाहत इत्यादी)
आजही त्याच मार्गाने जात आहात तरी लक्षात ठेवा राज्य कोणतेही असले तरी राजधान्या तुमच्या असल्या पाहिजेत आणि राजधानीचे सार्वभौमत्व तसेच तेथील विविधता टिकून ठेवणे हे आपले काम आहे. कारण विविधता असेल तरच आदान प्रदान होईल आणि ते करणारे व्यापारी (वैश्य ) जगतील आणि तुमची सुरुवात कशीही असो तुम्ही नगरे वसवण्यात सिंहाचा वाटा उचलला पाहिजे. सर्व विषमता जाणून त्यात खितपत पडण्यापेक्षा सर्व विषमता जाणून तुमची सध्याची परिस्थिती काय आहे आणि आपण सर्व एकमेकांवर अवलंबून अहोत हे जाणून प्रत्येक उपलब्ध गोष्टीचा उपयोग करायला शिका .
कारण युद्धजन्य परिस्थितीत संसाधने हे विकेंद्रित होतात जे कि एकाच वर्गाची मक्तेदारी म्हणून बघितले जातात आणि प्रत्येक संसाधनाचा योग्य वेळी योग्य ठिकाणी आणि योग्य रीतीने वापर केला तरच नगर भरभराटीस येतात.
आता नेमके काय करायचे ?
याचे उत्तर देतांना आपल्याकडे दोन मार्ग आहेत
एकतर आज जिथे आहात तिथे नागरी वसाहत स्वयंपूर्ण करा म्हणजे बाहेरून येणाऱ्या सगळ्या गोष्टी तुमच्या प्रदेशात असतील तर त्याचे उत्पादन सर्वांना पुरेल एवढे होईपर्यंतची व्यवस्था निर्माण करा
नाही तर मग असे एक ठिकाण निवडा जिथे सर्व आहे आणि तिथे जाऊन वसाहती निर्माण करा.
असे सांगितले जाते कि पृथ्वीवर एवढे आहे ज्याने सगळ्यांची "गरज "भागेल ,पण एवढेही नाही कि एखाद्याची "हौस" भागेल .
म्हणून जमिनीवरील संसाधनांचे चक्र हे वार्षिक किंवा पंचवार्षिक दशवार्षिक आहे जे कि आपल्या जीवनास पूरक तसेच पुढच्या पिढ्यांना माहिती देण्यास साजेसे आहे जमिनीखालील संसाधनाचे चक्र आपल्या जीवनचक्राच्या कितीतरी पटीने मंद आहे आणि जमिनीखाली असलेल्या संसाध्नासाठी लागणारे पदार्थ कसे जाऊन मिळतात हे आपल्याला माहित नाही याउलट जमिनीवरील सर्व संसाधनाची सर्व प्रक्रिया आपण करत असल्याने ती सोयीस्कर रित्या आपण पुनर्निर्मित करू शकतो .
या गोष्टी सर्वांना लहान पणापासून कळल्या पाहिजेत अशी व्यवस्था निर्माण करा.
आणि हो तुमची शरीररचना हि तुम्हाला लाभलेल्या जल,वायू , अधिवास यांवर अवलंबून आहे म्हणून कोणी जर तुमच्या रचनेवरून तुमची तुलना करत असेल तर तुमच्या रचनेचे सर्व बारकावे समजून सांगता येईल एवढे ज्ञान तरी तुमच्यात असावेच (यात अन्न वस्त्र आणि निवारा याचे ज्ञानाचा समावेश होतो). म्हणून कोणत्याही न्यूनगंडापायी अपप्रचाराला बळी पडून संपत्ती नष्ट करू नका.
आणि शेवटचे स्पष्ट बोलतो माफ करा "पण माझ्या मते कोणत्याही धर्माच्या पंथाच्या जातीच्या संप्रदायाच्या 'पुजार्यांना' जर ते ज्याच्या बळावर उपदेश करतात त्या ग्रंथांचे ज्ञान नसेल आणि त्या ग्रंथाचे ज्ञान असूनही ते देण्याची आसक्ती नसेल आणि शेवटी ग्रंथातील ज्ञानाला वैचारिक पातळीवर आजच्या काळानुसार काय बदल करायचा ते जमत नसेल तर ते माझ्या दृष्टीने देवाचे व्यापारी आहेत आणि काही नाही "
तसेच आजच्या काळात अनेक कारणांसाठी धर्मबदल करतांना प्रथम जिथे आहात ते ग्रंथ सविस्तर वाचा जिथे जाणार आहात ते सविस्तर वाचा आणि जो ग्रंथ आजच्या घडीला तुम्हाला न्याय देत असेल तो निवडा कारण एकदा तुमच्यात झालेले बदल तुमच्या पुढच्या पिढीने बघितले तर त्यांनाही जाणीव राहते कि जसे बदल आपल्यागोदर काही ठराविक कारणांसाठी झाले ते पुढे बदलावे किंवा न बदलावे .
राहणार: शेलगाव तालुका: माजलगाव जिल्हा: बीड
राज्य :महाराष्ट्र देश: भारत
वसुन्धरैव कुटुम्बकम
Saturday, January 28, 2017
चित्रपट विविधता आणि गुणधर्म
जय हिंद !!! जय महाराष्ट्र !!!
शिवम प्रल्हाद तौर
राहणार: शेलगाव तालुका: माजलगाव जिल्हा: बीड राज्य :महाराष्ट्र देश: भारत
वसुन्धरैव कुटुम्बकम
Saturday, January 30, 2016
सुभाषित :- संस्कृत संस्कृतीची देण
सुभाषित - ही एक चारोळी ,अभंग , यांसारखीच एक रचना आहे
यामध्ये दोन किंवा चार ओळींमध्येच खुप मोठा अर्थ सामावलेला असतो .
आम्ही जेव्हा ८ व्या ईयत्तेत पहिल्यांदा ही रचना
बघितली तेव्हा त्यातील आमच्या पसंतीच्या म्हणा
किंवा आमच्या जीवानाशी निगडीत म्हणा ह्या काही पुढील रचना
१:-गरीबीचा आशीर्वाद -Blessed are the poor!
bho dAridryaM namastubhyaM siddho&haM tatprasAdAtaH |
pashyAmyahaM jagat sarvaM na mAM pashyati kashchana ||
भो दारिद्र्यं नमस्तुभ्यं सिद्धोऽहं तत्प्रसादातः ।
पश्याम्यहं जगत् सर्वं न मां पश्यति कश्चन ॥
O poverty, homage to you; by your grace I have obtained magical powers:
I see the whole world, and nobody sees me!
"अरे दारिद्र्या तूला नमस्कार असो , तुझ्या ऊपकाराने मी सिद्ध झालो आहे की मी सर्व जगाला बघु शकतो , समजु शकतो पण मला कोणी बघत नाही किंवा कोणालाही माझ्याकडे बघावे असे वाटत नाही "
कोणत्याही गरीब शेतकऱ्यानेच याची रचना केली असावी कारण आजही सर्वात जास्त गरीब हे आपले अन्नदाते ऊत्पादक शेतकरीच आहेत
********************
२:- कपड्यावरुन ओळख
• Here is a subhAShita --wisdom words, that speaks about the samudra manthana--churning the ocean of milk, and says humorously that ultimately it was the dress that made the difference for the gods ViShNu and Shiva!
किं वाससा इत्यत्र विचारणीयं
वासः प्रधानं खलु योग्यतायै ।
पीताम्बरं वीक्ष्य ददौ स्वकन्यां
दिगम्बरं वीक्ष्य विषं समुद्रः ॥
kiM vAsasA ityatra vichAraNIyaM
vAsaH pradhAnaM khalu yogyatAyai |
pItAmbaraM vIkShya dadau svakanyAM
digambaraM vIkShya viShaM samudraH ||
"What's in one's dress"—-is a point for contemplation;
apparel is indeed important for appropriateness;
Looking at the one dressed in bright yellow clothes (MahAviShNu), the ocean gave him his daughter;
seeing the one dressed in nothing (Shiva) it gave him poison!
कोण म्हणेल वस्ञ माणसाची ओळख बनवत नाहीत वस्ञांनीच माणुस समजला जातो म्हणुनच
चमकदार पितांबर नेसलेल्या विष्णुला सागराने कन्या दिली तर दिगंबर शिवाला त्याच सागराने विष दिले
********************
३:- प्रसिद्धीसाठी कायकाय
• This one is about the persistent itch of becoming famous in us.
ghaTaM bhindyAt paTaM ChindyAt kuryAt rAsabharohaNaM |
yena kena prakareNa prasiddhaH puruSho bhavet ||
घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्यात् रासभरोहणं ।
येन केन प्रकरेण प्रसिद्धः पुरुषो भवेत् ॥
Breaking a pot, tearing a cloth, or riding on a donkey--
doing something by hook or crook, (everyone) tries to be famous!
घडा फोडणे , कपडे फाडणे , किंवा गाढवाची सवारी करणे असे प्रत्येकजण करत असतो कारण प्रत्येकजण प्रसिद्धीसाठी प्रयत्नशील असतो
(Reminded of the Guinness Book of World Records?)
********************
४:-भारतमातेला वंदन -
रत्नाकरधौतपदां हिमालयकिरीटिनीम् ।
ब्रह्मराजर्षिररत्नाढ्यां वन्दे भारतमातरम् ॥
To her whose feet are washed by the ocean, who wears the Himalayas as her crown, and is adorned with the gems of rishis and kings, to Mother India, do I bow down in respect.
--viShNu purANam
जिच्या चरणांना सागर धुतो आणि हिमालय जिचा मुकूट आहे ,जेथे अनेक राजे आणि ऋषीरुपी रत्न आहेत त्या भारतमातेला नमस्कार
*****************
५:- जागेवरच किंमत
स्थान भ्रष्टा न शोभन्ते दन्ताः केशाः नखाः नराः
Sthan Bhrashtaa Na Shobhenta Dantah Keshah Nakhah Naraah
i.e. Teeth, hairs,finger nails and persons lose their importance and are neglected once they are dislodged from their position (Sthaan Bhrashta). All the aforesaid four are cared and pampered so long they occupy their position.
जर दात,केस,नखे,आणि माणूस जागेवर नसतील तर त्यांची किंमत केली जात नाही (ते शोभुन दिसत नाहीत )
Wednesday, December 30, 2015
कथा २२ १/२ गावांची
एक क्षत्रिय राजघराणा
- - - - - - - - - - - - -
तौर-ठाकूर
(ठाकूर म्हणजे राजा)
महाराष्ट्रातील मराठवाडा भागात आणि तेही गोदावरी नदीच्या सुपीक पट्ट्यात तौर-ठाकूर या अभिमानी आडनावाने राहाणाऱ्या लोकांची काही गावे आहेत. जी की तौर-ठाकुर यांच्या जहागीरीतील गावे आहेत. तौर-ठाकूर यांच्या जहागीरीतील गावांची संख्या सुद्धा थोडी लॉजिकल अशीच आहे. ती म्हणजे ही जहागीरदारीतील गावे आहेत साडेबावीस.!
यांची साडेबावीस
गावांची यादी"...
2) गोपत पिंपळगाव, ता. गेवराई, जि. बीड.
3) ढालेगाव, ता. गेवराई, जि. बीड.
4) शेवनगाव, ता. घनसावंगी, जि. जालना.
5) कवडगाव, ता. माजलगाव, जि. बीड.
6) शेलगाव, ता. माजलगाव, जि. बीड.
7) रिधोरी, ता. माजलगाव, जि. बीड.
8) भादली, ता. घनसावंगी, जि. जालना.
9) गुंज, ता. घनसावंगी, जि. जालना.
10) लिंबी, ता. घनसावंगी, जि. जालना.
11) डुब्बा, ता. माजलगाव, जि. बीड.
12) काळेगाव, ता. माजलगाव, जि. बीड.
13) चांगतपुरी, ता. परतूर, जि. जालना.
14) सावरगाव, ता. परतूर, जि. जालना.
15) संकनपुरी, ता. परतूर, जि. जालना.
16) वारुळा, ता. माजलगाव, जि. बीड.
17) गोळेगाव पोकतपुरी, ता. परतूर, जि. जालना.
18) हिवरा, ता. माजलगाव, जि. बीड.
19) ठाकर आडगाव, ता. गेवराई, जि. बीड.
20) वडवणी, ता. वडवणी, जि. बीड.
21) बाबुलतारा (तौर बोंगे), ता. गेवराई, जि. बीड.
22) हिशी धामणगाव, ता. सेलू, जि. परभणी.
आणि अर्धे गाव
23) टाकरवन, ता. माजलगाव, जि. बीड.
- - - - - - - - -
(736-1193 ई)
(736-754 ई)-
अनंगपाल तोमर हे दिल्लीचे तंवर/तोवर वंशातील संस्थापक राजा होते. ज्यांना बीलनदेव, जाऊल अशा अनेक नावाने ओळखले जात होते.
(754-773)
राजा गंगदेव तंवर
(773-794)
राजा पृथ्वीमल तंवर
(794-814)
राजा जयदेव तंवर
(814-834)
राजा नरपाल तंवर
(834-849)
राजा उदयपाल तंवर
(849-875)
राजा आपृच्छदेव तंवर
(875-897)
राजा पीपलराजदेव तंवर
(897-919)
राज रघुपाल तंवर
(919-940)
राजा तिल्हणपाल तंवर
(940-961)
(961-979)-
यांच्या काळात साम्भर येथील राजा सिंहराज आणि लवणखेडा येथील (तोमर राजाचे) मंडलिक राजा सलवण यांच्यात युद्ध झाले. या युध्दात सलवण मारला गेला. त्यानंतर दिल्ली येथील राजा गोपाल देव तोमर याने सिंहराजवर आक्रमण करून त्याला युद्धात कापून काढले.
(979-1005)
जयपालदेव तंवर
(1005-1021)
कुमारपाल तंवर
(1021-1051)
लियाअनगपाल द्वितीय (1051-1081)
तेजपाल प्रथम (1081-1105)
महिपाल
(1105-1130)
विजयपाल
(1130-1151)
मदनपाल अथवा अनंगपाल तृतीय
(1151-1167)
अनंगपाल तृतीय यांच्या काळातील अजमेर येथील प्रतापी शासक विग्रहराज चौहान उर्फ़ बीसलदेव यांनी दिल्ली राज्यावर आक्रमण करून आपला अधिकार जमवला आणि तह करून मदनपाल तोमर यालाच दिल्लीचा राजा राहून दिले. मदनपाल तंवरने बीसलदेव चौहानच्या संगतीने तुर्कोंच्या विरुद्ध युद्ध केले आणि त्यांना पिटाळून लावले.
(1167-1189)
चाहाडपाल/गोविंदराज तंवर
d(1189-1192)
तेजपाल द्वितीय तंवर
(1192-1193 ई)
प्लो नो १३ अयोद्ध्यानगर
अंबड रोड जालना
९४२१४५७९५२
राहणार: शेलगाव तालुका: माजलगाव जिल्हा: बीड
राज्य :महाराष्ट्र देश: भारत
वसुन्धरैव कुटुम्बकम
Friday, December 25, 2015
जीवन एक चक्र आणि आजची असहिष्णुता
तर मित्रांनो या जीवनात काय काय होऊ शकते याची कल्पना आपल्याला येतच असते
तरी जीवन हे एक चक्र आहे ते कोणासाठीही थांबत नाही पण त्यात असे काय होऊ शकते कि ज्याने चक्र चालू राहते
याबद्दल मनातील विचार या ठिकाणी मांडतो आहे
कल्पनेच्या विश्वात आमची मजल तुम्हाला अर्पण
सुरुवात कशी झाली हे प्रत्येक जण सांगतो आपापल्या परीने
तरी आमच्या पुराणात (माणसाची गोष्ट ) सांगितल्या प्रमाणे वात शीला आणि जल यांच्या नंतर जीववरण तयार झाले
या जीवांना कसे जगावे हे शिकवण्यासाठी काही तुमच्या आमच्या सारख्याच कल्पना करू शकणाऱ्यां जीवांनी
औम कारापासून तर नृत्य , गायन वादन अशा 64 कला पर्यन्त आणि 7 तत्व आणि 4 वेदांपासून ते 4 वादांपर्यंत (साम दाम दंड भेद )
तसेच knowlegde पासून तर physics ,chem. , maths , bio, electron ,proton etc . सर्व तयार केले
याचाच वापर करत करत सामान्य जीव
पुढे चालून हेच जीव विकसित झाले (जसे आपण माकडापासून ,कार्टून नेटवर्क वर digimon, pokemon होतात ना तसेच ) आणि ते पुढेही चालूच राहील (जसे dragon ball zee मध्ये , x-men मध्ये,twilight saga मध्ये इत्यादी)
पण माणसाला नेहमीच आकर्षण असते ते इतरांपेक्षा वेगळे बनण्याची आणि म्हणूनच
दशावतार ,विष्णूपुराण , justice league, avengers यासारखे नवीन कार्यक्रम ह्याच कल्पना विश्वात रमणाऱ्या जीवांनी तयार केले पण त्याचा परिणाम असा झाला कि सामान्य जीव त्याचाही वापर करू लागले आणि नकळत हेच जीव स्वतःचाच ह्रास करून घेऊ लागले
आणि नियमानुसार जसे आले ते तसे परत जाणार जीव , जल, शीला, वात हे आपल्या सर्वाना माहिती आहे पण आम्हाला तसे होऊ द्यायचे नाही ये म्हणूनच कि काय जर निर्माता असेल किंवा नसेलही तरी याच जीवांना काही कारण हवे असते अस्तित्व दाखवण्यासाठी म्हणूनच यांनी सूरअसुर ,देवदानव ,सूर्यवंशी चंद्रवंशी ,ब्रम्हवंशी ,नागवंशी, हिंदू , मुस्लिम दक्षिणउत्तर पूर्वपश्चिम तयार केले
आणि यात सामान्य जीवांची काय चूक कि त्यांनी याचाच वापर करून सर्वव्यापी जगाचे प्रत्यक्षाप्रत्यक्ष तुकडे करून घेतले
पण पुढे चालून अशी जीवही तयार झाली ज्यांच्या जिव्हाळ्याने म्हणा किंवा त्यांचं कर्तव्य म्हणा कल्पना सोडून न देता खरेखुरे साहित्यही याच कल्पनारम्य जीवांनी व्यक्तीचरीञ्यालाही कल्पनेची जोड देत रामायण ,महाभारत , बायबल, कुराण हे परिस्थिती नुसार बदलत आणले
काही नग तर असेही निघाले
की एरवी एखाद्या भटाप्रमाणे तुम्ही आम्हाला सोडुन त्यांना मान का देता असे म्हणणारे हेच literal intelligentsia (बुद्धिजीवी हो !!!) जीव
धोक्यात घालुन दादरीच्या घटनेचा संबंध दाभोळकर आणि पानसरेंच्या हत्येशी लावतात आणि पुरस्कार वापसी करतात
यातलेच काही सांगतात की औरंगाबाद ला संभाजीनगर करने म्हणजे ईतिहास बदलण्यासारखे आहे (नेमाडे )
माझी कल्पना मला दाखवते की चालुच राहील
आम्ही सर्वप्रथम या जगात आलो आणि आम्ही या क्षेत्रातील मुलनिवासी हेच ठरविण्यात सामान्य जीवांचा असतीत्वासाठी संघर्ष चालुच राहील
आणि हेच बुद्धीजीवी त्यांनी निर्माण केलेल्या(ते किंवा त्यांची अभिव्यक्ती कारण असलेल्या ) युद्धप्रसंगी रडतील की आम्हाला मान मिळत नाहीये येथे असहिष्णुता (intolerance )वाढतेय पण ते हे विसरतात की जर दोन प्रदेशांत युद्ध चालले असेल तर अभिव्यक्ती दडपली जाणे सहाजीक आहे यात विशेष काही नाही (when there was war started no one comes to see my shows hence I cremated my theater
ref. Film hugo of hollywood just watch for this message
त्या माणसाला स्वतःच्या थिएटर ला आग लावावी लागली कारण युद्धामुळे त्याला आणि त्याच्या कलेला मान मिळत नव्हता पण त्याने आजच्या बुद्धीजीवींप्रमाणे कधीच युद्धाला प्रसिद्धीसाठी हत्यार बणविले नाही )
असो
....
जर खरेच अभिव्यक्ती माणसाला जगवत चलवात असेल तर एवढे ध्यानी ठेवावे की
पुढे चालुन तुमच्या हातांनीच देव आणि त्यांचेही युद्ध घडतील (x-Men series मध्ये पुढच्या चिञपटात राम होता आणि स्वतःला कृष्णा सांगणारा खलनायक दाखवणार आहे असे म्हणतात हीच का ती अभिव्यक्ती
काय भरोसा पुढे चालुन avengers त्याच दिशेने वळाले तर )
येथे एक मुद्दा अजुन येतो की जर ती अभिव्यक्ती नसुन संशोधन आहे
म्हणजे आपल्याच पुराणांचे english मध्ये decoding (आवृत्तीकरण
उदा. चंद्रवंशी आणि सुर्यवंशीच vampires आणि warewolf आहेत का???)किंवा एखाद्या सर्वव्यापी अपघातानंतर (जगबुडी , हिमयुग ) जगासमोर हीच अभिव्यक्ती पुराण, ईतिहास म्हणुन जगासमोर येईल तेव्हा पुन्हा जीवनाचे चक्र सुरु होईल आणि पुन्हा सामान्य जिवांचा असतित्वासाठी संघर्ष (आम्ही जुने, आम्ही मुलनिवासी) चालुच राहिल
तोपर्यंत जोपर्यंत जगात जिव आहेत आणि कदाचीत बाकी आवरणांचेही चक्र असेलच
संशोधन चालु आहे
जय हिंद !!! जय महाराष्ट्र !!!
शिवम प्रल्हाद तौर
राहणार: शेलगाव तालुका: माजलगाव जिल्हा: बीड राज्य :महाराष्ट्र देश: भारत
वसुन्धरैव कुटुम्बकम