Saturday, January 28, 2017

चित्रपट विविधता आणि गुणधर्म

आजच्या जगात चित्रपट हे मध्यम आणि मनोरंजन् व्यवसायाचे एक प्रभावी शस्त्र आहे. तरीही जगात प्रत्येक ठिकाणच्या चित्रपटांविषयी तुलनात्मक माहिती आपण प्रामुख्याने सांगू शकतो उदा. चीनच्या कोणत्याही चित्रपटात कुंग फु असतेच . कितीही प्रयत्न केला तरी बॉलीवूड च्या चित्रपटातून आपण प्रेम नावाचा प्रकार आपल्याला काही अंशी का होईना दाखवलेलाच दिसतो. तर प्राथमिक मुद्दा असा कि हॉलीवूड चे चित्रपट ह्यांचा मुल गुणधर्म आहे निर्माण (प्रत्येक चित्रपटात निर्माण किंवा मानवनिर्मित गोष्टींना ज्या आज अस्तित्वात आहेत ) ते प्रत्येक गोष्टीत दाखवून देतात कि मानव काय निर्माण करू शकतो त्याने काय काय निर्माण केले त्याची बुद्धी कशी चालते इत्यादी . तर भारतीय चित्रपटात भावना महत्वाची तत्व महत्वाचे (इतिहासातही  डोकावून बघणारे सर्व चित्रपट हे नाही दाखवत कि काय काय निर्माण झाले  ) जरी कितीही चित्रपटात  निर्माण दाखवले तरी माणसाची ओळख , मुत्सद्देगिरी ,तत्व ,ह्या गोष्टी त्या निर्माणावर मात करून जातेच. आणि सहसा माणसामाणसांतील वाद , वैमनस्य , त्याची कारणे हे अत्यंत चांगल्या रीतिने येथे दाखवले जाते.   
   म्हणूनच कि काय येथील मनामनात त्याचा परिणाम झाल्याशिवाय राहत नाही या व्यक्तीपुजक देशात, जास्त अधिकार असलेल्या माणसाला (गटप्रमुख)येथे गटाचे मालक समजले जाते, मुळात तोही गटाचा (team) एक हिस्सा असतो हे कुणी मानतच नाही . तर हॉलीवूड मध्ये जरी गटप्रमुख दाखवला गेला तरी त्याच्या तोडीचे अनेक माणसे आपल्याला विवध ठिकाणी काम करतांना दिसतात .
संस्कृतीचे दर्शन आपल्याला याच चित्रपटांद्वारे घडते उदा.फ़क़्त परिणाम हा होतो कि निर्माण गाभा असलेल्या हॉलीवूड मध्ये रीतसर एखाद्या निर्माणाच श्रेय दुसरे कसे घेतात तसेच जे निर्माण करूनही जर त्याचे श्रेय न भेटल्याने वाईट मार्ग स्वीकारतात आणि वाईट ठरवले जातात हे ठसवले गेले असल्याने प्रत्येक जण श्रेय घेण्यासाठी धडपड करत असतो. 
आणि बॉलीवूड मध्ये अथवा सर्व भारतीय चित्रपट असे दाखवून देतात कि काही महत्वाकांक्षी लोकांमुळे जरी एखाद्या माणसाची प्रतिमा मलीन केली गेली तरी येथील माणसे प्रत्येकाच्या भूमिकेला न्याय देण्याच्या मार्गाने विचार करतात आणि त्यांना कळत कि यात मुळ श्रेय कोणाच असेल म्हणूनच कि काय आज श्रेय कोणीही घेतले तरी काही फरक पडत नाहि तसेच  आज जगाला तोडणारे कितीही मुद्दे असले तरी ते आपण खोडून काढून किंवा ते न करताही जगू शकतो.
तरीही याचा उलट वापर होतो हे हि धरून चालावेच लागते आणि असा वापर बुद्धीजीवी लोकच करतात आणि ते लोकं हे हि विसरून जातात कि आपल्याला भेटलेल्या प्रसिद्धीचा कोणाची निंदा करण्यासाठी वापर करणे आपल्या प्रसिद्धी साठी धोकादायक तर आहेच तसेच तुमची निंदा करणारेही तयार होतात याकडे दुर्लक्ष करून कसे चालेल 
आपले मत मांडण्याचे माध्यम म्हणून जरी बुद्धीजीवी याकडे बघत असले तरी इतिहास बदलण्याचे साधन म्हणून याकडे बघू नये(भले ते श्रेय हस्तांतरण असेल किंवा बदनामी असेल ) हि माझी अपेक्षा !!!

जय हिंद !!! जय महाराष्ट्र !!!
शिवम प्रल्हाद तौर 
राहणार: शेलगाव  तालुका: माजलगाव  जिल्हा: बीड  राज्य :महाराष्ट्र  देश: भारत
वसुन्धरैव कुटुम्बकम    

Saturday, January 30, 2016

सुभाषित :- संस्कृत संस्कृतीची देण

सुभाषित - ही एक चारोळी ,अभंग , यांसारखीच एक रचना आहे
यामध्ये दोन किंवा चार ओळींमध्येच खुप मोठा अर्थ सामावलेला असतो .
आम्ही जेव्हा ८ व्या ईयत्तेत पहिल्यांदा ही रचना
बघितली तेव्हा त्यातील आमच्या पसंतीच्या म्हणा
किंवा आमच्या जीवानाशी निगडीत म्हणा ह्या काही  पुढील रचना

१:-गरीबीचा आशीर्वाद -Blessed are the poor!

bho dAridryaM namastubhyaM siddho&haM tatprasAdAtaH |
pashyAmyahaM jagat sarvaM na mAM pashyati kashchana ||

भो दारिद्र्यं नमस्तुभ्यं सिद्धोऽहं तत्प्रसादातः ।
पश्याम्यहं जगत् सर्वं न मां पश्यति कश्चन ॥

O poverty, homage to you; by your grace I have obtained magical powers:
I see the whole world, and nobody sees me!

"अरे दारिद्र्या तूला नमस्कार असो , तुझ्या ऊपकाराने मी सिद्ध झालो आहे की मी सर्व जगाला बघु शकतो , समजु शकतो पण मला कोणी बघत नाही किंवा कोणालाही माझ्याकडे बघावे असे वाटत नाही "

कोणत्याही गरीब शेतकऱ्यानेच याची रचना केली असावी कारण आजही सर्वात जास्त गरीब हे आपले अन्नदाते ऊत्पादक शेतकरीच आहेत

********************
२:- कपड्यावरुन ओळख
• Here is a subhAShita --wisdom words, that speaks about the samudra manthana--churning the ocean of milk, and says humorously that ultimately it was the dress that made the difference for the gods ViShNu and Shiva!

किं वाससा इत्यत्र विचारणीयं
वासः प्रधानं खलु योग्यतायै ।
पीताम्बरं वीक्ष्य ददौ स्वकन्यां
दिगम्बरं वीक्ष्य विषं समुद्रः ॥

kiM vAsasA ityatra vichAraNIyaM
vAsaH pradhAnaM khalu yogyatAyai |
pItAmbaraM vIkShya dadau svakanyAM
digambaraM vIkShya viShaM samudraH ||

"What's in one's dress"—-is a point for contemplation;
apparel is indeed important for appropriateness;
Looking at the one dressed in bright yellow clothes (MahAviShNu), the ocean gave him his daughter;
seeing the one dressed in nothing (Shiva) it gave him poison!

कोण म्हणेल वस्ञ माणसाची ओळख बनवत नाहीत वस्ञांनीच माणुस समजला जातो म्हणुनच
चमकदार  पितांबर नेसलेल्या विष्णुला सागराने कन्या दिली तर दिगंबर शिवाला त्याच सागराने विष दिले
********************
३:- प्रसिद्धीसाठी कायकाय
• This one is about the persistent itch of becoming famous in us.

ghaTaM bhindyAt paTaM ChindyAt kuryAt rAsabharohaNaM |
yena kena prakareNa prasiddhaH puruSho bhavet ||

घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्यात् रासभरोहणं ।
येन केन प्रकरेण प्रसिद्धः पुरुषो भवेत् ॥

Breaking a pot, tearing a cloth, or riding on a donkey--
doing something by hook or crook, (everyone) tries to be famous!

घडा फोडणे , कपडे फाडणे , किंवा गाढवाची सवारी करणे असे प्रत्येकजण करत असतो कारण प्रत्येकजण प्रसिद्धीसाठी प्रयत्नशील असतो

(Reminded of the Guinness Book of World Records?)

********************
४:-भारतमातेला वंदन -

रत्नाकरधौतपदां हिमालयकिरीटिनीम् ।
ब्रह्मराजर्षिररत्नाढ्यां वन्दे भारतमातरम् ॥

To her whose feet are washed by the ocean, who wears the Himalayas as her crown, and is adorned with the gems of rishis and kings, to Mother India, do I bow down in respect.

--viShNu purANam

जिच्या चरणांना सागर धुतो आणि हिमालय जिचा मुकूट आहे ,जेथे अनेक राजे आणि ऋषीरुपी  रत्न आहेत त्या भारतमातेला नमस्कार

*****************
५:- जागेवरच किंमत

स्थान भ्रष्टा  न शोभन्ते दन्ताः केशाः नखाः नराः
Sthan Bhrashtaa Na Shobhenta Dantah Keshah Nakhah Naraah

i.e. Teeth, hairs,finger nails and persons lose their importance and are neglected once they are dislodged from their position (Sthaan Bhrashta). All the aforesaid four are cared and pampered so long they occupy their position.
जर दात,केस,नखे,आणि माणूस जागेवर नसतील तर त्यांची किंमत केली जात नाही (ते शोभुन दिसत नाहीत )

Wednesday, December 30, 2015

कथा २२ १/२ गावांची

तोमर/तोवर/तंवर/तौर
एक क्षत्रिय राजघराणा
- - - - - - - - - - - - -
तौर-जहागीरदार,
तौर-ठाकूर
(ठाकूर म्हणजे राजा)
@
महाराष्ट्रातील मराठवाडा भागात आणि तेही गोदावरी नदीच्या सुपीक पट्ट्यात तौर-ठाकूर या अभिमानी आडनावाने राहाणाऱ्या लोकांची काही गावे आहेत. जी की तौर-ठाकुर यांच्या जहागीरीतील गावे आहेत. तौर-ठाकूर यांच्या जहागीरीतील गावांची संख्या सुद्धा थोडी लॉजिकल अशीच आहे. ती म्हणजे ही जहागीरदारीतील गावे आहेत साडेबावीस.!
तौर-ठाकुर यांची तब्बल साडेबावीस गावची जहागीरदारी असली, तरी अगदी जहागीरदार असल्याच्या वा ठाकूर म्हणजे राजा, राज घराण्यातील असल्याचा कसलाच अविर्भाव अथवा अभिमान न दाखवता राहाणारे लोक म्हणून तौर घराण्याची ओळख आहे. या साडेबावीस जहागीरीतील गावांखेरीज तौरांची उस्मानाबाद जिल्ह्य़ात सुद्धा काही गावे आढळतात. उस्मानाबाद जिल्ह्य़ातील कळंब तालुक्यात तौर यांची 'देशमुख' आडनाव लाऊन अभिमानाने वावरणारी अजून वेगळी चार गावे (गावांची संख्या जास्त असू शकते) सुद्धा पाहायला मिळतात.
अलिकडे इतिहासातील अनेक नवनवीन अभ्यासक आहेत, की ज्यांचा राजपुतांमधून मराठ्यांची उत्पत्ती झाली असावी, या गोष्टीला विरोध आहे. मात्र मराठवाडय़ातील तौर घराण्यावर अभ्यास केल्यास वरील अभ्यासकांचा विरोध मावळेल. कारण तौर घराण्याचा पूर्वज इतिहास हा उत्तरेतील तोमर/तोवर/तंवर राजपुतान्यातील कुळातील इतिहासाशी जुळलेला आहे. वरील सिद्धांताने अभ्यास न केल्यास तौर घराण्यावर अभ्यास करणे शक्य होणार नाही, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
तौर आणि सोळंके या दोन्ही घराण्यातील लोकांना त्यांचा पूर्वीचा इतिहास विचारल्यास या लोकांचे महाराष्ट्रात येण्याचे कारण हे देवगिरीची लढाई असेच सांगितले जाते. अल्लाउद्दीन खिलजी याचे देवगिरी राज्यावर आक्रमण झाल्याने, देवगिरीच्या राजाने मदतीसाठी राजस्थान राज्यातील (आताचे गुजरात) सोलंकी राजांना मदतीचे आवाहन केले होते. त्यानुसार गुजरातेतून सोलंकी आणि तंवर राजांच्या फौजा देवगिरीच्या मदतीसाठी निघाल्या होत्या. मात्र दुर्दैवाची गोष्ट म्हणजे सोलंकी आणि तंवर यांच्या फौजा देवगिरी येथे पोहोचण्या पूर्वीच राजा रामदेवराय यादव आणि अल्लाउद्दीन खिलजी यांच्यात तह झाला.
या तहाने यादव राजाला क्षणार्धात मंडलिक राजा बनविले. तलवारीच्या पात्याला रक्ताचा एक थेंबही न लागता रामदेवराय कडून सर्व काही मिळालेल्या अल्लाउद्दीन खिलजीचे धाडस अजूनच वाढले आणि त्याने रस्त्यावर चालणाऱ्या सोलंकी आणि तंवर फौजांवर आक्रमण केले. या दोन्ही फौजांमध्ये तुंबळ हाणामारी होऊन त्यात सोलंकी आणि तंवर फौजांचा पाडाव झाला. खिलजीने क्षणाचाही विलंब न करता सोळंकीच्या राजधानीच्या पाटन शहराकडे सैन्य दामटवले आणि पाटन शहरावर चढाई करून ते ताब्यात घेतले.
खिखिलजीच्या अशा या दुहेरी आक्रमणाने सोलंकी आणि तंवर यांच्या फौजा बेघर झाल्या. बेघर झालेल्या तंवर लोकांनी मराठवाडय़ातील दंडकारण्याचा भाग असलेल्या गोदावरी नदीच्या काठावर आपले बस्तान बसवले. तर सोलंकीच्या बेघर झालेल्या लोकांनी सह्याद्री पर्वतरांगेत आपली छावणी टाकली आणि पुढे या छावणीला सोळंकीची राजस्थान राज्यातील राजधानी असलेल्या पाटनची आठवण म्हणून पाटन हे नाव दिले.
सख्या आणि चुलत अशा तेवीस भावंडांचे बळ असलेल्या तंवर यांनी गोदावरी नदीच्या खोऱ्यात आपली तेवीस गावे बसवली. या गावात बावीस पूर्ण आणि एका अर्ध्या गावाचा समावेश असल्याने तंवरांची साडेबावीस गावे असल्याचे सांगण्यात येऊ लागले.
तंवरांच्या साडेबावीस गावातील सर्वात थोरले गाव म्हणून उक्कडगाव हे गाव असल्याने, तंवरांची साडेबावीस गावे मोजताना सर्वात अगोदर उक्कडगाव येथून मोजदाद करावी लागते. आणि ही मोजणी थोरल्या भावापासून धाकट्या भावाकडे (गाव) मोजत नेण्याची पद्धत आहे.
"तौर-जहागीरदार
यांची साडेबावीस
गावांची यादी"...
1) उक्कडगाव, ता. घनसावंगी, जि. जालना.
2) गोपत पिंपळगाव, ता. गेवराई, जि. बीड.
3) ढालेगाव, ता. गेवराई, जि. बीड.
4) शेवनगाव, ता. घनसावंगी, जि. जालना.
5) कवडगाव, ता. माजलगाव, जि. बीड.
6) शेलगाव, ता. माजलगाव, जि. बीड.
7) रिधोरी, ता. माजलगाव, जि. बीड.
8) भादली, ता. घनसावंगी, जि. जालना.
9) गुंज, ता. घनसावंगी, जि. जालना.
10) लिंबी, ता. घनसावंगी, जि. जालना.
11) डुब्बा, ता. माजलगाव, जि. बीड.
12) काळेगाव, ता. माजलगाव, जि. बीड.
13) चांगतपुरी, ता. परतूर, जि. जालना.
14) सावरगाव, ता. परतूर, जि. जालना.
15) संकनपुरी, ता. परतूर, जि. जालना.
16) वारुळा, ता. माजलगाव, जि. बीड.
17) गोळेगाव पोकतपुरी, ता. परतूर, जि. जालना.
18) हिवरा, ता. माजलगाव, जि. बीड.
19) ठाकर आडगाव, ता. गेवराई, जि. बीड.
20) वडवणी, ता. वडवणी, जि. बीड.
21) बाबुलतारा (तौर बोंगे), ता. गेवराई, जि. बीड.
22) हिशी धामणगाव, ता. सेलू, जि. परभणी.
आणि अर्धे गाव
23) टाकरवन, ता. माजलगाव, जि. बीड.
तौर-ठाकूर जहागीरदार यांची वरील जहागीरदारीतील साडेबावीस गावे आहेत. तौर हा हजारो वर्षाचा राज घराणा आहे. तौर म्हणजे ठाकूर (राजे) आहेत. शिवाय त्यांना साडेबावीस गावची जहागीरदारी असल्याने तौर हा घराणा जहागीरदार आहे. गावात आपल्यापेक्षा कोणी मोठा नसावा म्हणून या घराण्यातील लोकांनी गावपातळीवरील पाटीलकी घेतलेल्या आहेत. तौर- ठाकूर- जहागीरदार अशा घराण्यातील मोठाल्या उपाध्या आडनावा समोर लावायच्या सोडून हे लोक तौर आडनावा समोर "पाटील" ही (सर्व उपाध्यातील खालची पदवी.!) गावपातळीवरील पदवी लावून मिरवताना दिसत आहेत.
तौर घराण्याचा इतिहास
- - - - - - - - -
तोमर/तोवर/तंवर/तौर हा उत्तर-पश्चिमी भारतातील एक प्रमुख राजपूत राजवंश आहे. तोमर क्षत्रिय हे छत्तीस कुळी क्षत्रियातील चन्द्रवंशी कूळ असून या कुळाला पाण्डु पुत्र अर्जुनाचे वंशज मानले जाते. यांचे गोत्र अत्री आहे.
तोमर/तंवर हा वंश उत्तर मध्य काळातील खूप ताकतवर वंश मानला जातो. उत्तर पश्चिमी भारतातील मोठ्या भागात या कुळाचे राज्य होते. तोमर/तंवर/तौर यांच्या राज्याची राजधानी ढिल्लिका (आजची दिल्ली) ही होती. तंवर राज्यनिर्मितीचे श्रेय हे याचं वंशातील तोमर राजांना दिले जाते.
राजपूत वंशामध्ये तोमर/तोवर/तंवर या वंशाचे एक श्रेष्ठ असे स्थान आहे. भारतीय पौराणिक कथेतून असे लक्षात येते की, सुरुवातीच्या काळात तोमर लोकांचे निवासस्थान हे हिमालयातील आसपासच्या परिसरात होते. मात्र दहाव्या शतकात हे लोक करनाल पर्यंत विखुरले आढळून आले आहेत. ठाणेश्वर या भागात सुद्धा यांचे राज्य विखुरलेले होते.
त्या वेळी उत्तर भारतातील कान्यकुब्ज भागात प्रतिहार राजपूत वंशातील राजांचे साम्राज्य विस्तारलेले होते. परिहार साम्राज्यातील मांडलिक राजे म्हणूनच तंवर राजांनी दक्षिणेत स्थलांतरित होण्यास सुरुवात केली.
ढिल्लिका (दिल्ली) मध्ये तंवर यांचा शासनकाल कोणत्या काळातील असावा हे अनिश्चित असले तरी विक्रम संवत दहाव्या आणि अकराव्या शतकात आपल्याला सांभरचे चौव्हाण आणि तोमर यांच्यातील युद्धाचे उल्लेख सापडतात. तोमर नरेश रुद्र हा चौहाण राजा चंदन याच्या हातून मारला गेला होता. तसेच तंत्रपाल तोमर हा चौहान राजा वाक्पति याच्याकडून पराभूत झाला होता. वाक्पति चौहान राजाचा मुलगा सिंहराज चौहान याने तोमर नरेश सलवण याचा खून केला होता.
मात्र चौहान राजा सिंहराज सुद्धा काही दिवसांनी मारला गेला. सिंहराज चौहान हा तोमर यांच्या हातूनच मारला गेला असावा असे लक्षात येते. यावरून असे दिसते की तोमर राजे हे त्या काळी दिल्लीचे राजे बनले होते.
मोहम्मद गझनीच्या सर्वात सुरुवातीच्या आक्रमणावेळी दिल्ली-थानेश्वर येथील तोमर राजवंश हा उत्तर-पश्चिमी भारतातील एक शक्तीशाली राज घराणा समजला जात होता. तोमर राजांनी आपल्या राज्याचा मोहम्मद गझनीच्या हातून वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्यांना यात यश आले नाही.
इ.सन् १०३८ ते इस. १०९५ या काळात दिल्ली राज्याने अनेक अनुभव अनुभवले. मोहम्मद गझनीचा मुलगा मसूदने हांसी वर आक्रमण करून ते ताब्यात घेतले. मसूदचा मुलगा मजदूदने थानेश्वर जिंकून आपल्या ताब्यात घेतले. आणि तोमर यांची राजधानी दिल्लीवर आक्रमण करण्यासाठी तयारी सुरू केली. असे वाटू लागले होते की मुसलमान दिल्ली राज्य समाप्त केल्याविना आता गप्प बसणार नव्हते. मात्र तोमर राजांनी गजनीच्या आक्रमणाचा धाडसाने सामना करण्यासाठी तयारी सुरू केली. तोमर राजवंशातील महीपाल तोमर या राजाने सैन्याची जमवाजमव करून गजनीच्या आक्रमणाला मोडून काढण्याची तयारी सुरू केली.
महीपाल तोमर यांनी फक्त हांसी आणि थानेश्वर येथील किल्लेच जिंकून घेतले नाहीत, तर सैन्याने कांगडा येथे सुद्धा आपले विजयी निशान फडकावले. तंवरांनी इतका भीम पराक्रम केला होता, की गजनीचे भाग्यच बलवत्तर म्हणून तंवरांच्या हातून लाहोर शहर ताब्यात घेणे थोडक्यात वाचले.
तंवरांच्या या विजयाचे त्या काळी कौतुक व्हायला हवे होते, मात्र झाले उलटेच. तंवरांच्या या विजयाने राजपुतान्यात विद्वेषाग्नी भडकला गेला. तोमरांवर आजुबाजुच्या राजपुतान्यातील राज्यांचे आक्रमणे वाढू लागली. तंवरांनी या आक्रमणाला यथोचित यथाशक्ति उत्तर दिले. विक्रम संवत् ११८९ (सन् ११३२) मध्ये श्रीधर कवी यांच्या पार्श्वनाथचरित् ग्रंथावरून असे लक्षात येते की, तंवर साम्राज्याच्या वेळी त्यांच्या राज्याची राजधानी असलेले दिल्ली ही त्या काळात समृद्ध नगरी म्हणून ओळखली जात होती. तेथील तंवर राजे अनंगपाल तंवर आपल्या शौर्य आणि इतर गुणांनी सर्वत्र विख्यात असलेले राजे होते.
अनंगपाल तंवर द्वितीय यांनी मेहरोली येथे लोखंडी स्तंभावर स्तंभलेख लिहून त्याची दिल्लीत स्थापना केली होती. बिजलियाँ शिलालेखावरून बीसलदेव चौहान (विग्रहराज चतुर्थ) ने विक्रम संवत् १२०८ (सन् ११५१ ईo) मध्ये तंवरांना हरवून दिल्लीवर त्यांचे निशान फडकावले. त्या नंतर तंवर राजे हे चौहान राजांचे मांडलिक राजे म्हणून दिल्लीत राज्य करू लागले. पृथ्वीराज चौहान यांच्या दिल्लीतील पराभवा नंतर दिल्लीवर मुसलमान राजवटीला सुरुवात झाली.
फिरोजशाहा तुगलक याच्या राजवटीच्या काळात ग्वाल्हेरवर तंवरांच्या एका दुसर्‍या शाखेने राज्य प्रस्थापित केले. यानंतर ग्वाल्हेर येथे जवळपास १५० वर्ष तंवरांचे राज्य होते.
राजा रामसाह तंवर यांनी हल्दीघाटी युद्धात राजा महाराणा प्रताप यांना मदत केली होती. हल्दीघाटीच्या या प्रसिद्ध युध्दात लढताना रामसाह तंवर आणि त्यांचे दोन जवान मुले शहीद झाले. ग्वाल्हेर येथील तंवरांनी कला, साहित्य आणि संस्कृतिच्या सरंक्षणासाठी खूप मोठे कार्य केले होते.
दिल्ली येथे तंवरांच्या पराभवा नंतर तोमर/तंवर राजपूत वेगवेगळ्या दिशांनी विखुरले गेले. यातील एका तंवर शाखेने उत्तरी राजस्थान मधील पाटन भागात जाऊन आपले राज्य स्थापित केले. ज्याला जयपूर राज्याचा एक भाग समजले जात होते. सध्या या भागाला 'तंवरवाटी' अथवा 'तोरावाटी' अशा नावाने ओळखले जाते. सध्या सुद्धा या भागात तंवरांची ठिकाणे आहेत. यातील मुख्य ठिकाण मात्र पाटण हेच आहे.
तंवरांची दुसरी एक शाखा चंबळ भागात गेली, तिला 'तोमर राजपूतो की बसापत' म्हटले जाते. तंवरांच्या या बसापतीत (वसाहतीत) १४०० गावांचा समावेश आहे. या क्षेत्राला (परिसराला) तंवरघार या नावाने ओळखले जाते. तंवरांच्या या शाखेने अनेक पिढ्या ग्वाल्हेरवर राज्य केले. पश्चिमी उत्तर प्रदेश आणि हरियाणा या भागात सुद्धा तोमरांचे राज्य होते. तिथे आज सुद्धा तोमर/तंवर राजपूत खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात.
पश्चिमी उत्तर प्रदेशातील गाजियाबाद जिल्ह्य़ात असलेल्या पिलखुवा भागात तोमर/तंवर राजपूतांची 84 गावे आहेत. यात मुकीमपुर गढ़ी सुद्धा आहे. ज्यांनी 1857 च्या उठावात भाग घेतला होता. यामध्ये तंवरांचे अनेक लोक शहीद झाले होते. गढ़मुक्तेश्वर जवळ सुद्धा तंवरांची 42 गावे आहेत.
राजा अनंगपाल तंवर यांचा एक मुलगा भद्रसेन तंवर याने गढ़मुक्तेश्वर येथे येऊन अहिरांचा हा भाग जिंकून घेतला होता. आणि येथे भदस्याना नावाचे एक गाव बसवले होते. या गावापासून भैना, धौलपुर, लिसडी असे अनेक गावांचे निर्माण होऊन आज मितिला ही संख्या 42 गावांची आहे. मेरठ जवळ सुद्धा तोमर/तंवरांची 12 गावे आहेत. यामध्ये सिसौली, मऊ ख़ास, पंचगांव अशा नावाची ही गावे आहेत.
बुलंदशहर जिल्ह्य़ात सुद्धा तोमर/तंवरांची 24 गावे आहेत. गुलावठी आणि सिकंदराबाद यांच्या मध्ये असलेलेले बराल हे तोमर/तंवर यांचे एक प्रमुख गाव आहे. खुर्जाच्या जवळ सुद्धा तोमर/तंवर यांची धरपा सहीत 5 गावे आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की ,तोमर/तंवर/तौर यांच्या लोकांना एका शेजारी अनेक गावांच्या वसाहती तयार करून राहण्याची जुनीच सवय आहे. अथवा ही त्यांची संस्कृती आहे असेच म्हणावे लागेल.
पश्चिमी उत्तर प्रदेशात तोमर/तंवर यांची आडनाव बदलून राहाणारी दुसरी एक शाखा आहे. या शाखेला जंघारा अशा नावाने ओळखले जाते. या शाखेचा इतिहास खूप गौरवशाली आहे. ज्यांनी अनेक वर्षापर्यंत आत्ताच्या रोहिल्लखंडात मुस्लिम शासकांच्या विरोधात टक्कर घेतली होती. जंघारा (तंवर) यांनी मुसलमान राजवटीला कधी सुखाची झोप लागू दिली नव्हती. दिल्लीतील पराभव झाल्यानंतर काही तोमर/तंवर यांनी रोहिल्लखंडातील अहीरांना पिटाळून येथे राज्य प्रस्थापित केले होते.
जंघारा या शब्दाचा अर्थ 'जंग के लिए भूखे' असा आहे. हा खूप मोठा लढाऊ वंश आहे. यामुळे रोहिलखंडात राहाणाऱ्या तंवर या वंशाला जंघारा हे नाव पडले आहे.  तंवर वंशातील जंघारा आडनावाने राहाणारे लोक बरेली, शाहजहाँपुर, बदायूं, एटा, फर्रुखाबाद आदी भागांत खूप मोठ्या संख्येने बघायला मिळतात. अलीगढ़ भागात सुद्धा जंघारा (तंवर) यांची 42 गावे आहेत.
या व्यतिरिक्त आगरा, फीरोजाबाद आदि जिल्ह्य़ात सुद्धा तोमर/तंवर राजपूत मोठ्या संख्येने पाहायला मिळतात. हरियाणा राज्यातील भिवानी भागात सुद्धा मोठ्या प्रमाणावर तंवर राजपूत बघायला मिळतात. ज्यांना 'जाटू तंवर' नावाने ओळखले जाते. मेवाड़च्या सलुंबर ठिकाणच्या राजाने तंवर राजपूतांच्या हातून युद्धात ज्या मुण्डकटी आणि सिरकटी केल्या, त्या बदल्यात तंवरांना अनेक गावे जहागीरीमध्ये दिली गेली. त्या गावापैकी बोरज, तंवरान, सलुम्बर अशी काही तंवरांच्या जहागीरीतील गावे आहेत.
काही तोमर/तंवर राजपूतांनी दुसर्‍या जातीतील स्त्रिया ठेवल्याने, त्यांच्या संबंधातून तोमर वंश हा जाट, गूजर आणि अहीर अशा जातीत सुद्धा विभागाला गेला. जाट लोकात असे अनेक उप आडनावे आहेत, जे की स्वतःला तोमर/तंवर मानीत आहेत.
यामध्ये पिलानिया, नैन, मल्लन, लाम्बा, खटगर, खरब, ढंड, भादो, खरवाल, सोखिरा, रोनिल, सकन, बेरवाल आणि नारू अशा आडनावाचा समावेश आहे. हे लोक पूर्वी तोमर वा तंवर उप आडनाव वापरत नव्हते. मात्र यांच्यातील बहुतांश लोक स्वतःचे गोत्र आता तोमर वा तंवर लावू लागले आहेत. उत्तर प्रदेशातील बड़ौत भागातील सलखलेन् जाट सुद्धा स्वतःला सलखलेन् तोमर यांचे वंशज सांगताना दिसत आहेत. हे लोक स्वतःला अनंगपाल तोमर यांच्या वंशातील असल्याचे सांगत असून आता ते स्वतःला तोमर/तंवर म्हणवून घेवू लागले आहेत.
गुजर लोकात सुद्धा तोमर राजपूतांचे अवशेष बघायला मिळतात. खटाना गूजर हे स्वतःला तोमर/तंवर राजपूतांमधून निर्माण झाल्याचे मानत आहेत. तर ग्वाल्हेर जवळ टोंगर गूजर आहेत, जे स्वतःला ग्वाल्हेरचा राजा मान सिंह तोमर यांची गूजरी राणी मृगनयनी हिचे वंशज मानतात. ज्यांना गूजरी (ठेवलेली) मातेची संतान असल्या कारणाने राजपूतांनी स्वीकार केले नव्हते.
दक्षिणी दिल्लीत सुद्धा तंवर गूजर यांची गावे आहेत. मुस्लिम शासनकाळात जेव्हा तोमर/ तंवर राजपूत दिल्लीमधून निष्काषित होऊन इतरत्र राज्य करण्यासाठी गेले मात्र काही तोमर राजपूतांनी गूजर बनून मुस्लिम राजवटीच्या अधीन राहणे स्वीकार केले. ते हे आजचे दिल्लीतील तंवर-गुजर आहेत. हरियाणा मधील अहिर मध्ये सुद्धा दयार गोत्र पाहायला मिळते. जे स्वतःला तोमर/तंवर राजपूत वंशातून निघालेले मानतात.
*दिल्लीतील तोमर/तंवर राजे
दिल्लीतील तंवर(तोमर) राजे
(736-1193 ई)
अनंगपाल तोमर (प्रथम)
(736-754 ई)-
अनंगपाल तोमर हे दिल्लीचे तंवर/तोवर वंशातील संस्थापक राजा होते. ज्यांना बीलनदेव, जाऊल अशा अनेक नावाने ओळखले जात होते.
राजा वासुदेव तंवर
(754-773)
राजा गंगदेव तंवर
(773-794)
राजा पृथ्वीमल तंवर
(794-814)
राजा जयदेव तंवर
(814-834)
राजा नरपाल तंवर
(834-849)
राजा उदयपाल तंवर
(849-875)
राजा आपृच्छदेव तंवर
(875-897)
राजा पीपलराजदेव तंवर
(897-919)
राज रघुपाल तंवर
(919-940)
राजा तिल्हणपाल तंवर
(940-961)
राजा गोपाल देव तंवर
(961-979)-
यांच्या काळात साम्भर येथील राजा सिंहराज आणि लवणखेडा येथील (तोमर राजाचे) मंडलिक राजा सलवण यांच्यात युद्ध झाले. या युध्दात सलवण मारला गेला. त्यानंतर दिल्ली येथील राजा गोपाल देव तोमर याने सिंहराजवर आक्रमण करून त्याला युद्धात कापून काढले.
सुलक्षणपाल तोमर
(979-1005)
जयपालदेव तंवर
(1005-1021)
कुमारपाल तंवर
(1021-1051)
लियाअनगपाल द्वितीय (1051-1081)
तेजपाल प्रथम (1081-1105)
महिपाल
(1105-1130)
विजयपाल
(1130-1151)
मदनपाल अथवा अनंगपाल तृतीय
(1151-1167)
अनंगपाल तृतीय यांच्या काळातील अजमेर येथील प्रतापी शासक विग्रहराज चौहान उर्फ़ बीसलदेव यांनी दिल्ली राज्यावर आक्रमण करून आपला अधिकार जमवला आणि तह करून मदनपाल तोमर यालाच दिल्लीचा राजा राहून दिले. मदनपाल तंवरने बीसलदेव चौहानच्या संगतीने तुर्कोंच्या विरुद्ध युद्ध केले आणि त्यांना पिटाळून लावले.
पृथ्वीराज तोमर
(1167-1189)
चाहाडपाल/गोविंदराज तंवर
d(1189-1192)
तेजपाल द्वितीय तंवर
(1192-1193 ई)



 

for more info contact 
धिरजसिंह रवींद्र तौर
प्लो नो १३ अयोद्ध्यानगर
अंबड रोड जालना
९४२१४५७९५२


शिवम प्रल्हाद तौर
राहणार: शेलगाव  तालुका: माजलगाव  जिल्हा: बीड
राज्य :महाराष्ट्र  देश: भारत
वसुन्धरैव कुटुम्बकम   
९९७०१९५१५६
https://www.google.com/maps/d/edit?mid=11vAiQ_4ATdjHoIkbiQkOd4lCbi1TufQq&usp=sharing

Friday, December 25, 2015

जीवन एक चक्र आणि आजची असहिष्णुता

तर मित्रांनो या जीवनात काय काय होऊ शकते याची कल्पना आपल्याला येतच असते 
तरी जीवन हे एक चक्र आहे ते कोणासाठीही थांबत नाही पण त्यात असे काय होऊ शकते कि ज्याने चक्र चालू राहते

याबद्दल मनातील  विचार या ठिकाणी मांडतो आहे
कल्पनेच्या विश्वात आमची मजल तुम्हाला अर्पण

सुरुवात कशी झाली हे प्रत्येक जण सांगतो आपापल्या परीने
तरी आमच्या पुराणात (माणसाची गोष्ट ) सांगितल्या प्रमाणे वात शीला आणि जल यांच्या नंतर जीववरण तयार झाले

या जीवांना कसे जगावे हे शिकवण्यासाठी काही तुमच्या आमच्या सारख्याच कल्पना करू शकणाऱ्यां जीवांनी
औम कारापासून तर नृत्य , गायन वादन अशा 64 कला पर्यन्त आणि 7 तत्व आणि 4 वेदांपासून ते 4 वादांपर्यंत (साम दाम दंड भेद )
तसेच knowlegde पासून तर physics ,chem. , maths , bio, electron ,proton etc . सर्व तयार केले

याचाच वापर करत करत सामान्य जीव
पुढे चालून हेच जीव विकसित झाले (जसे आपण माकडापासून ,कार्टून नेटवर्क वर  digimon, pokemon होतात ना तसेच  ) आणि ते पुढेही चालूच राहील (जसे dragon ball zee मध्ये , x-men मध्ये,twilight saga मध्ये  इत्यादी) 
पण माणसाला नेहमीच आकर्षण असते ते इतरांपेक्षा वेगळे बनण्याची आणि म्हणूनच
दशावतार ,विष्णूपुराण , justice league, avengers यासारखे नवीन कार्यक्रम ह्याच कल्पना विश्वात रमणाऱ्या जीवांनी तयार केले पण त्याचा परिणाम असा झाला कि सामान्य जीव त्याचाही वापर करू लागले आणि नकळत हेच जीव स्वतःचाच ह्रास करून घेऊ लागले

आणि नियमानुसार जसे आले ते तसे परत जाणार     जीव , जल, शीला, वात हे आपल्या सर्वाना माहिती आहे पण आम्हाला तसे होऊ द्यायचे नाही ये म्हणूनच कि काय जर निर्माता असेल किंवा नसेलही तरी याच जीवांना काही कारण हवे असते अस्तित्व दाखवण्यासाठी म्हणूनच यांनी सूरअसुर ,देवदानव ,सूर्यवंशी चंद्रवंशी ,ब्रम्हवंशी ,नागवंशी, हिंदू , मुस्लिम  दक्षिणउत्तर पूर्वपश्चिम तयार केले

आणि यात सामान्य जीवांची काय चूक कि त्यांनी याचाच वापर करून सर्वव्यापी जगाचे प्रत्यक्षाप्रत्यक्ष तुकडे करून घेतले

पण पुढे चालून अशी जीवही तयार झाली ज्यांच्या जिव्हाळ्याने म्हणा किंवा त्यांचं कर्तव्य म्हणा कल्पना सोडून न देता खरेखुरे साहित्यही याच कल्पनारम्य जीवांनी व्यक्तीचरीञ्यालाही कल्पनेची जोड देत रामायण ,महाभारत , बायबल, कुराण हे परिस्थिती नुसार  बदलत आणले

काही नग तर असेही निघाले
की एरवी एखाद्या भटाप्रमाणे तुम्ही आम्हाला सोडुन त्यांना मान का देता असे म्हणणारे हेच literal intelligentsia (बुद्धिजीवी हो !!!) जीव
धोक्यात घालुन दादरीच्या घटनेचा संबंध दाभोळकर आणि पानसरेंच्या हत्येशी लावतात आणि पुरस्कार वापसी करतात
यातलेच काही सांगतात की औरंगाबाद ला संभाजीनगर करने म्हणजे ईतिहास बदलण्यासारखे आहे (नेमाडे )
माझी कल्पना मला दाखवते की चालुच राहील

आम्ही सर्वप्रथम या जगात आलो आणि आम्ही या क्षेत्रातील मुलनिवासी हेच ठरविण्यात सामान्य जीवांचा असतीत्वासाठी संघर्ष चालुच राहील

आणि हेच बुद्धीजीवी त्यांनी निर्माण केलेल्या(ते किंवा त्यांची अभिव्यक्ती कारण असलेल्या ) युद्धप्रसंगी रडतील की आम्हाला मान मिळत नाहीये येथे असहिष्णुता (intolerance )वाढतेय  पण ते हे विसरतात की जर दोन प्रदेशांत युद्ध चालले असेल तर अभिव्यक्ती दडपली जाणे सहाजीक आहे यात विशेष काही नाही (when there was war started no one comes to see my shows hence I cremated my theater

ref. Film hugo of hollywood just watch for this  message

त्या माणसाला स्वतःच्या थिएटर ला आग लावावी लागली कारण युद्धामुळे  त्याला आणि त्याच्या कलेला मान मिळत नव्हता पण त्याने आजच्या बुद्धीजीवींप्रमाणे कधीच युद्धाला प्रसिद्धीसाठी हत्यार बणविले नाही )
असो

....
जर खरेच अभिव्यक्ती  माणसाला जगवत चलवात असेल तर एवढे ध्यानी ठेवावे की
पुढे चालुन तुमच्या हातांनीच देव आणि त्यांचेही युद्ध घडतील (x-Men  series मध्ये पुढच्या चिञपटात राम होता आणि स्वतःला कृष्णा सांगणारा खलनायक दाखवणार आहे असे म्हणतात हीच का ती अभिव्यक्ती 

काय भरोसा पुढे चालुन avengers त्याच दिशेने वळाले तर )

येथे एक मुद्दा अजुन येतो की जर ती अभिव्यक्ती नसुन संशोधन आहे

म्हणजे आपल्याच पुराणांचे english मध्ये decoding (आवृत्तीकरण
उदा. चंद्रवंशी आणि सुर्यवंशीच vampires आणि warewolf आहेत का???)किंवा एखाद्या सर्वव्यापी अपघातानंतर (जगबुडी , हिमयुग ) जगासमोर हीच अभिव्यक्ती पुराण, ईतिहास म्हणुन जगासमोर येईल तेव्हा पुन्हा जीवनाचे चक्र सुरु होईल आणि पुन्हा सामान्य जिवांचा असतित्वासाठी संघर्ष (आम्ही जुने, आम्ही मुलनिवासी) चालुच राहिल

तोपर्यंत जोपर्यंत जगात जिव आहेत आणि कदाचीत बाकी आवरणांचेही चक्र असेलच

संशोधन चालु आहे

जय हिंद !!! जय महाराष्ट्र !!!
शिवम प्रल्हाद तौर 
राहणार: शेलगाव  तालुका: माजलगाव  जिल्हा: बीड  राज्य :महाराष्ट्र  देश: भारत
वसुन्धरैव कुटुम्बकम    

Wednesday, November 18, 2015

सांस्कृतिक आक्रमणे ओळखा

जुन्या काळात  सतीप्रथा , बालविवाह यांना विरोध करणारे आज कसेकाय लहान मुलांना संभोगाच्या शिक्षणाच्या नावाखाली उघडेनागडे करू शकतात हा माझा प्रश्न आहे
ज्यांना आजही जग त्या देशाच्या राजाराणीमुळे ओळखते त्यांनीच भारतातील राजेशाही संपविली काही पचत नाही आणि आजही काही उदारमतवादी तरुण म्हणताना आढळतात इंग्रज आले म्हणुन भारतात रेल्वे आली नाहीतर...
अरे पण येथील वस्तुविनिमय पद्धती जेथे शेतकरी उत्पादक आणि विक्रेता दोन्ही होता ती पद्धती बंद करुन येथील शेतकऱ्यांना नेहमी साठी मारवाडी , व्यापारी यांच्या ताब्यात देणारेही तेच इंग्रज कोणाला का दिसु नयेत 
कारण सध्या जागतीक भाषा english आहे. म्हणुन सगळ्या गोष्टींचे इंग्रजीत decoding (भाषांतर म्हणा हव तर ) चालु आहे आणि इंग्रज कसे महान होते ते लिहीणारे लेखक त्या काळापासुन आजही भरभराटीस आलेले आहेत 
अरे या मिञ देशांसोबत मैञी म्हणजेच मुळात भांडवलशाहीला आमंञण जे की पाश्चिमात्यांचे जगण्यासाठीचे साधन आहे 
याउलट पौर्वात्य देश जेथे समाजवाद म्हणजे जीवन आहे तेथेच जनता सुखी समाधानी आहे आणि भारत कृषिप्रधान देश असल्याने येथे समाजवादाला प्राधान्य असलेच पाहीजे 
तसेच जर आम्ही अजुन खोलात जाण्याचा विचार केला तर दाक्षिणात्य राज्ये हिंदी भाषेच्या वापरासही विरोध करतात अशी परिस्थिती आहे 
आणि आम्हा महाराष्ट्रातील माणसांचे काय सांगावे पंजाबी प्रांतात आम्हाला मद्रासी समजले जाते तर कानडी, तामीळ लोकांसाठी आम्ही north indian आहोत ,जातानाही divide & rule (फोडा आणि झोडा) एकदम व्यवस्थित बसवुनच english कार्यकर्ते फरार झाले. पण त्यांची संस्कृती आजही आपण  पाळतो  आहोत याचा आपण विचार केला पाहिजे 

Wednesday, September 9, 2015

राजे राज्य तेव्हाच करतील जेव्हा मावळ्यांमध्ये जिव्हाळा असेल

       


        या दंडकारण्यात अनेक राजे जन्मले आणि राज्य करून त्यांच्या गोष्टी ,कहाण्या मागे सोडून गेले
पण तरीही फार क्वचितच आहेत जे सर्वांच्या मनात घर करून गेले .
        साम ,दाम, दंड, भेद  या माणसाने व्यवहारासाठी आखून ठेवलेल्या रेषा आहेत.
या दंडकारण्यात दामाने व्यापारी आणि भेदाने पुजारी राज्य करून गेले, दंड या राज्याचा पाया आहे म्हणून दंडाचे राज्य चालूच राहील, पण जो येथे सामावादासाठी संवाद साधतो त्याची गरज नेहमीच राहिली आणि राहीलही.  
       तसेच दंडाने आणखी एक गोष्ट साध्य झाली आहे ती म्हणजे उठाव , सत्तेत असणाऱ्या विरुद्ध उठाव करणाऱ्यांची येथे कधीच उणीव भासली नाही म्हणजे दंडकारण्य बदलास कारणीभूत ठरते. पण जर आजच्या जगाची गोष्ट असेल तर लोक आता तुमच्या मागे किती आहेत या पेक्षा तुमच्या सोबत किती आहेत हे बघतात आपल्यासारखे जीव निर्माण करण्याची जाणीव आपल्याला  निर्मात्याने दिली आहे पण आपल्यासारखे माणसे निर्माण करण्याची जाणीव आज आपल्याला नसावी हि बाब  तर्कशास्त्रात बसत नाही विचारांनी भाजी भाकरी मिळत नाही त्यासाठी कष्टच  करावे लागतात हि गोष्ट जरी खरी असली तरी माणसाने कसे आणि कशासाठी जगावे हे शिकवणे गरजेचे होते म्हणून या रूढी, प्रथा ,परंपरा जिवनात आल्या तरीही वाईट जुन्या चालीरीती टाकून देऊन नवीन रिती शिकणे तसेच आदर्श गोष्टी पुढे चालू ठेवणे म्हणजे प्रबोधन,प्रबोधन हि एक आवर्त संकल्पना आहे जसे विज्ञानात कोणतीही गोष्ट अंतिम सत्य नाही तसेच प्रबोधनहि कधी थांबणार नाही.  आज आपण global village हि संकल्पना ऐकतो तेव्हा आपण असे मानू कि आज जगाला जोडणारे जगाचे राजे आहेत भले प्रत्येक देश स्वतःच्या राजाला प्रधानमंत्री , हुकुमशहा,राजा, सम्राट काहीही उपमा देवोत पण जर त्यांनी जगाशी संबंध तोडण्याचे प्रयत्न केले तर त्यांना जमिनीवर आणण्याची ताकद आता सर्वसामान्यामध्ये आज आहे आणि जरी राजेशाही पुन्हा आली तरी राज्यक्रांतीला सोबत घेऊनच येईल
म्हणून जर सर्व जनतेत राजाबद्दल जिव्हाळा असेल तोवर तो राजा राहील
आज एवढेच
जय हिंद !!! जय महाराष्ट्र !!!
शिवम प्रल्हाद तौर
राहणार: शेलगाव  तालुका: माजलगाव  जिल्हा: बीड  राज्य :महाराष्ट्र  देश: भारत
वसुन्धरैव कुटुम्बकम   

      

Tuesday, August 25, 2015

माणसाची गोष्ट

माणसाची गोष्ट

         माणूस माकडापासून विकसित झाला असे बरेच विद्वान म्हणतात . तो विकसित होताना त्याच्यामध्ये अनेक  बदल झाले ,ते कशा रीतीने झाले हे मांडण्यासाठी हा लेख .
           माणूस अगोदर एकटा होता म्हणून जगणे आणि उपजणे एवढेच त्याचे काम . पुढे तो विचार करू लागला पण एकांतात ,आपल्यासारखाच कि जग कसे निर्माण झाले असावे आपण कसे जगतो आहे वगैरे वगैरे(तो विचार कसा करू लागला हा संशोधनाचा विषय आहे असो ) प्रथम तो एकटाच विचार करत असे म्हणून अनुभव(experience ) आणि स्मृती (memory )यांच्या  जोरावर त्याने जगणे वाढवले  पुध्ये एकासमोर एक असे अनेक विचार करणारे एकत्र आले आणि संभाषण कौशल्यांची निर्मिती झाली सुरुवातीला अमौखिक अलिखित (हातवारे, हालचाली ) नंतर मौखिक (बोलीभाषा) पुढे चीन्हांपासून लिखित संभाषण आणि आज  मौखिक  लिखित (speech to  text ) संभाषणापर्यंत मानव आला आहे.
    पण प्रथम माणसे जेव्हा संभाषण करत तेव्हा ते आपल्या जीवनातील काहीच पण प्रभावी प्रसंग मांडत असत . त्यामुळे माणसे जिवांतील सर्व प्रसंग क्वचितच मांडू शकत पण जीवनातील रहस्यमय प्रसंग म्हणजे आपण केलेले प्रवास आणि म्हणून पुढे प्रवासवर्णनांची भर पडली. पण प्रसंग आठवून तो सांगणे म्हणजे सांगणाऱ्याची भाषा ,त्याचा बघण्याचा दृष्टीकोण याचा प्रभाव त्यात असे. आणि त्याचे प्रत्येक वेळी वक्त्यानुसार पुनर्न्विकरण  व्हायचे(randome access memory) , म्हणून पुढे तंतोतंत माहिती प्रसारासाठी लिखित म्हणजे (read only memory) साहित्य ज्याला आज शास्त्र , वेद ,वांग्मय  अशा नावांनी संबोधले जाते त्याची सुरुवात झाली असावी . त्यातही प्रभावी प्रसारासाठी लिखित साहित्याकडून चित्रकलेकडे विचारवंत माणसे वळली .
  तसेच पुढे चालून या चित्र कलेचेच रुपांतरण चलत्चिञ म्हणजे चित्रपटात झाले  आज video पाहणे,पाठवणे, आणि बनमाहिविणे सहज सोपे झाले आहे म्हणून माहिती प्रसार वेगाने होत  
  तरीही अभ्यासक म्हणून विचार केला तर लक्षात येते की हे माध्यम जरी प्रखर आहे पण त्यातील ञुटी लक्षात येतील अशा आहेत 
   उदा. प्रत्येक माध्यम privacy(वैयक्तिक जीवन जगण्याची मुभा ,गुप्तता ) आणि piracy ( चाचेगिरी) ह्या ञूटींचा सामना करत असते पण इथे प्रभाव थोडा जास्तच आढळतो आणि चित्रपटमाध्यमाला लागते ती silicon semiconductor ne बनलेली मेमोरी ह्यात जशी माहिती साठवली जाते तितक्याच सहजतेने ती मिटवली पण जाते 
   म्हणजे कागदावर साठवलेल्या माहितीपेक्षा याची जास्त काळजी घेण्याची गरज असते आणि सुरक्षितता कमी आहे तरीही या प्रखर माध्यमाचा वापर केला जावा आणि यातुन जमा झालेल्या माहिती सर्वांना उपलब्ध असावी यापासुन कोणालाच वंचित ठेवण्याची अपेक्षाही ठेवु नये 
  जय हिंद!!! जय महाराष्ट्र !!!